ठाणे : तडीपार आरोपीला शस्त्रासह अटक
Thane Tadipar Latest News : पाच जिल्ह्यातून एका वर्षांसाठी तडीपार केलेल्या आरोपीला शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली, तडीपार कालावधी पूर्ण होण्यापूर्वी शहरात वावर
ठाणे :- सराईत आरोपी मारामारी, गंभीर दुखापत, बेकायदेशीररित्या हत्यार आदी, गुन्ह्यात आरोपी असलेल्या एका तडीपार गुन्हेगाराला ठाण्याच्या राबोडी पोलिसांनी Rabodi Police station अटक केली आहे. आरोपी जवळ बेकायदेशीररित्या सुरा हे हत्यारही होते. तसेच,आरोपीला ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, नवी मुंबई आणि रायगड या जिल्ह्यातून एक वर्षाच्या कालावधी करिता 29 मार्च 2024 रोजी हद्दपार केले होते. Thane Tadipar गुन्हेगारास बेकायदेशीर प्रवेश आणि हत्यार बाळगल्याप्रकरणी राबोडी पोलिसांनी गुन्हा दाखल करीत गजाआड केले. Thane Latest Crime News
पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून,ही घटना मंगळवार 06 रोजी रात्रीच्या सुमारास घडली. मुस्ताक युनुस कुरेशी (26 वर्ष, रा. राबोडी, ठाणे) असे तडीपार असलेल्या आरोपीचे नाव आहे. याला पोलीस उप आयुक्त परिमंडळ 01 ठाणे यांनी 1 वर्षाच्या कालावधी करिता मार्च महिन्याच्या दरम्यान ठाणे, मुंबई शहर,मुंबई उपनगर,नवी मुंबई रायगड या जिल्ह्यातून हद्दपार केले होते. परंतु,आरोपी हा शहरात वावर करत असताना पोलीस आयुक्त ठाणे शहर आशुतोष डुंबरे Thane CP Ashutosh Dumbare आणि पोलीस उप आयुक्त परिमंडळ 01,ठाणे यांची परवानगी न घेता शहरात सर्रास प्रवेश करत होता. आरोपीला मनाई आदेश असतानाही कोणाचीही परवानगी न घेता शस्त्रासह (चाकू) शहरात आला होता. राबोडी पोलिसांच्या पथकाला माहिती मिळून पोलिसांनी सापळा रचून तडीपार आरोपीला शस्त्रासह अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीच्या विरोधात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142,37(1),135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात का वावरत होता? त्यांनी पुन्हा एकदा गुन्हा केला आहे का? याचा सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक गव्हाणे हे करत आहे. Thane Latest Crime News