Thane Crime News : चोरीच्या मोबाइलची नेपाळमध्ये विक्री ; दोन आरोपींना नौपाडा पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Thane Latest Crime News : ठाण्यातून चोरी केलेल्या मोबाइलची मध्य प्रदेश,नेपाळमध्ये विक्री करणाऱ्या दोन चोरट्यांना नौपाडा पोलिसांनी ठाण्यातून अटक केली.
ठाणे :- ठाण्यातून चोरी Thane Mobile Stolen केलेल्या मोबाइलची मध्य प्रदेश, नेपाळमध्ये विक्री करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना नौपाडा पोलिसांनी अटक केली. “Urgent Arrest: Thane Police Catch Two Robbers Selling Stolen Mobiles in Nepal” आरोपी फैज वाहीद शेख (20 वर्ष रा. भिवंडी) आणि अझरुद्दीन मोईनुद्दीन मोमीन (रा. भिवंडी) अशी अटकेतील चोरट्यांची नावे आहेत. नौपाडा पोलीस ठाण्याच्या Nowpada Police News हद्दीत मागील काही दिवसांपासून मोबाईल चोरीचे प्रमाण वाढले आहे. अनुषंगाने पोलिसांनी कारवाई करत दोन सराईत आरोपींना मोबाईल चोरी प्रकरणी अटक केली आहे. Thane Police Latest News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 एप्रिल 2024 रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात मोबाईल चोरी संदर्भात तक्रार दाखल होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज च्या मदतीने जवळपास 80 ते 90 सीसीटीव्ही फुटेज पाहणी करून आरोपी आरोपी फैज वाहीद शेख याच्या येण्या जाण्याच्या मार्गावर पोलिसांनी पाळत ठेवली. “Thane police cracks down on stolen mobile phone racket in Nepal” पोलिसांनी सापळा रचून आरोपीला मोठ्या शिताफीने मोटर सायकल वरून जात असताना अटक केली होती. पोलीस कस्टडी दरम्यान आरोपीकडे केलेल्या तपासात त्याने त्याचा साथीदार अझरुद्दीन मोईनुद्दीन मोगीन याचेसह नौपाडा पोलीस ठाणे हद्दीत मोबाईल चोरी करत असल्याचे कबुली दिली.फोन खेचून घेतल्याचे 4 गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. Thane Police Latest News
अझरुद्दीन मोईनुद्दीन मोमीन (रा. भिवंडी) हा सुमारे 4 महिन्यापासून भिवंडीतून फरार होता.ठाव ठिकाण माहिती नसल्याने त्याचा तांत्रिक माहितीच्या आधारे माहिती घेतली असता आरोपी सतत त्याचे ठिकाण बदलत होता. त्याचे हालचालींवर पाळत ठेवून, गुप्त बातमीदाराने दिलेल्या बातमीवरून 10 ऑगस्ट आरोपी अझरुद्दीन मोईनुद्दीन मोमीन हा माजीवाडा, ठाणे येथे होंडा युनिकॉर्न मोटारसायकलवर चोरीचे मोबाईल फोन विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश भांगे व पथकाने माजीवाडा, ठाणे येथून अटक केली आहे. “Thane police’s relentless pursuit leads to arrest of 2 robbers selling stolen phones in Nepal” सापळा रचून आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना त्याचा पाठलाग करून शिताफीने त्यास पकडून अटक करण्यात आली आहे.पोलीस कस्टडी दरम्यान आरोपी अझरुद्दीन मोईनुद्दीन मोमीन याचेकडे केलेल्या चौकशीमध्ये आरोपीने व त्याचा साथीदार याचेसह एकूण 5 गुन्हे केल्याचे उघड झाले आहे.आरोपी अझरुद्दीन माईनुद्दीन मोमीन हा चोरी केलेले मोबाईल फोन त्याचा मुंबई मधील एका डिलर मार्फत मध्यप्रदेश व तेथून नेपाळ येथे पाठवत असल्याची तपासात माहिती मिळाली असून, त्याचा शोध व तपास चालू आहे.आरोपींकडुन तपासा दरम्यान चोरी केलेले एकूण 5 लाख 40 हजार रू. किंमतीचे 24 मोबाईल फोन 2 मोटारसायकल हस्तगत करण्यात आले आहेत. Thane Police Latest News
पोलीस पथक
पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, Thane CP Ashutosh Dumbare सह पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रा. विभाग विनायक देशमुख,पोलीस उप आयुक्त, परि. 1 सुभाष बुरसे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती प्रिया डमाळे नौपाडा विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद कुंभार, पोलीस निरीक्षक सुनिल तांबे (प्रशासन) यांचे मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी मंगेश भांगे, सहायक पोलीस निरीक्षक, दत्तात्रय लोंढे, पोलीस उपनिरीक्षक मकानदार, पोलीस हवालदार गायकवाड, पाटील, देसाई,रांजणे, गोलवड, तडवी, पोलीस नाईक माळी, पोलीस शिपाई कांगणे, तिर्थकर, यांनी केलेली आहे. Thane Police Latest News