Thane Crime News : शिळ डायघर पोलीस स्टेशन ; दखलपात्र गुन्हे करण्याच्या उददेशाने अवैध हत्यारांचा साठा करणारे व रिक्षा चोरी करणारे आरोपीला जेरबंद
•Thane Crime News पोलिसांनी दोन आरोपींना केले अटक, आरोपींनी चोरी केलेल्या रिक्षा पोलिसांनी केले जप्त, शस्त्रसाठाही जप्त
ठाणे :- पोलीस उपनिरीक्षक संकेत शिंदे हे तपास पथकातील अंमलदार असे वरिष्ठांचे आदेशाने शिळफाटा येथे नाकाबंदी कर्तव्य करत असतांना रात्रौ 01.45 वा. सुमारास मुंब्रा पनवेल रोडने मुंब्रा दिशेने भरधाव वेगात येत असलेली एक रिक्षा पाहिली. त्यामध्ये दोन व्यक्ती बसलेले होते. त्यांच्यावर संशय आल्याने रिक्षा रोडच्या कडेला थांबवण्यास सांगून रिक्षा थांबवून ॲटो रिक्षातील व्यक्तीची विचारपुस केली जात असताना रिक्षात पाठीमागे बसलेले एक संशयीत इसम रिक्षातुन उतरून पळुन जात असताना पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांनी त्यास आवाज देउन थांबण्याचा इशारा केला असता, तो न थांबता पळून जात होता. त्यास सोबत असणारे स्टाफच्या मदतीने पाठलाग करून ताब्यात घेऊन त्याचेकडे विचारपुस केली असता तो उडवाउडविची उत्तरे देऊ लागल्याने पोलीस उपनिरीक्षक संकेत शिंदे यांनी दोन पंचाना बोलावून त्यांना नांव पत्ता विचारून त्यांची अंगझडती घेतली असता एक लोखंडी कोयता, एक रेडमी कंपनीचा मोबाईल फोन, दोन लॉखडी तलवार मिळून आले. त्यांचे ताब्यातील रिक्षाचे कागदपत्राबाबत विचारपूस केली असता सदरची रिक्षा ही दोन्ही आरोपी आपसात मिळून अभयनगर परिसरातून चोरी केल्याची कबूली दिली. त्या अनुषंगाने शिळ डायघर पोलीस ठाण्यातील गुन्हे अभिलेख तपासला असता सदर रिक्षा ही शिळ डायघर भा.द.वि.क 379 प्रमाणे गुन्हयातील असल्याचे निष्पन्न झाले. रिक्षा व मुददेमाल हस्तगत करण्यात आली आहे. त्यामुळे नमुद आरोपी इसमांविरुध्द शिळ डायघर पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भारतीय हत्यार कायदा कलम 4,25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1), 37(3), 135 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला व तपास चालु आहे. Thane Crime News
गुन्हयाचा तपास यातील अटक आरोपी यांच्याकडे अटकेनंतर गुन्हयाच्या अनुशंगाने सखोल तपास केला असता, आरोपी नामे अरबाज शेख याने त्याचे निवदेन पंचनाम्यामध्ये दोघांनी मिळून चोरून आणलेल्या दोन ॲटा रिक्षा दाखविल्याने जप्त करण्यात आल्या आहे. मुंब्रा पो.स्टे. ठाणे गुन्हा भा.द.वि कलम 379 या दाखल गुन्हयातील चारोची असल्याचे निष्पन्न झाले. तसेच ॲटा रिक्षा दाखल गुन्हयातील चारोची असल्याचे निष्पन्न झाले. तसेच आरोपी नामे गौरव उर्फ बाल्या याच्या घरघडतीमध्ये 7 वेगवेगळ्या वर्णनाचे तलवार, सुरा, कायता मिळून आल्याने जप्त करण्यात आले आहे. अटक आरोपीत यांच्याकडे केलेल्या प्राथमिक तपासात रिक्षा चोरीचे 3 गुन्हे उघडणीस आणले आहे. Thane Crime News
अटक आरोपीचे नाव
1) गौरव उर्फ बाल्या शिवराम वाघे, (19 वर्षे),
2) अरबाज शौकत अली पठाण,( 20 वर्षे) दोन्ही आरोपींना अटक केले असून त्यांच्या जवळील सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
पोलीस पथक
पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे Ashutosh Dumbare,पोलीस सह आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अप्पर पोलीस आयुक्त विनायक देशमुख, पोलीस उप आयुक्त सुभाष बुरसे, परिमंडळ 1. सहाय्यक पोलीस आयुक्त उत्तम कोळेकर, कळवा विभाग, शिळ डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिपान शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनिल वरुडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिळ डायघर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक संकेत शिंदे, पोलीस हवालदार नागराज सोनकडे, रतिलाल वसावे, महेद्र लिंगाळे, मुकुंद आव्हाड, पोलीस शिपाई विजय खाडे, पोलीस शिपाई सुशिल पवार यांनी सदर गुन्हयाचा कौशल्यपूर्ण तपास करून गुन्हे उघडकीस आणले आहे. Thane Crime News