• ठाणे, पुणे, नवी मुंबई, कल्याण आणि भिवंडीत धुमाकूळ; महागड्या मोटारीसह 39 लाख 53 हजारांचे दागिने जप्त
ठाणे :- ठाणे, पुणे, नवी मुंबई, कल्याण आणि भिवंडी शहरात बंद घरे लक्ष्य करून धुमाकूळ घालणाऱ्या ‘शिकलकर टोळीला’ ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने (Crime Branch) अटक केली आहे. या चौघांच्या अटकेमुळे ठाणे आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील 40 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून, पोलिसांनी त्यांच्याकडून महागड्या मोटारीसह 39 लाख 56 हजार रुपयांचे दागिने आणि मुद्देमाल जप्त केला आहे.
गुन्ह्यांची कबुली आणि टोळीची ओळख
कल्याणमधील एका घरफोडीच्या प्रकरणाचा समांतर तपास गुन्हे अन्वेषण शाखेच्या कल्याण युनिटने सुरू केला होता. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी विजयसिंग अंधासिंग जुन्नी उर्फ शिकलकर (24 वय), सोनुसिंग जितेंद्रसिंग जुन्नी (27 वय), सन्नी करतासिंग सरदार (27 वय) आणि अतुल खंंडाळे (24 वय) या चौघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी सर्व गुन्ह्यांची कबुली दिली.
पुणे कनेक्शन: विजयसिंग, सोनुसिंग आणि अतुल हे तिघे पुण्यातील हडपसर भागातील रहिवासी आहेत.
सर्वाधिक गुन्हे: यातील तिघांविरोधात यापूर्वीच पुण्यातील विविध पोलीस ठाण्यांत एकूण 28 गुन्हे दाखल आहेत. एकटा विजयसिंग याच्याविरोधात सर्वाधिक 20 गुन्हे दाखल आहेत.
40 गुन्हे उघडकीस
या टोळीच्या अटकेमुळे ठाणे आणि नवी मुंबईतील घरफोडीच्या अनेक घटनांचा उलगडा झाला आहे. यामध्ये ठाणे आयुक्तालय क्षेत्रातील डोबिवली, विष्णुनगर, नारपोली, मुंब्रा, कळवा, मानपाडा, कोळसेवाडी, मध्यवर्ती, शिवाजीनगर, बदलापूर, महात्मा फुले, विठ्ठलवाडी या पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच, नवी मुंबई आयुक्तालय क्षेत्रातील खांदेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेही उघडकीस आणणे शक्य झाले.
ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण शाखेच्या कल्याण युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे आणि त्यांच्या पथकाने ही अत्यंत महत्त्वाची कामगिरी पार पाडली.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…