Thane Share Market Fraud : ऑनलाइन आर्थिक फसवणूक ; शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून फसवणूक
Thane Share Market Fraud News : शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करून अधिक नफा मिळेल आमिष दाखवून महिलेची फसवणूक
ठाणे :- कोलशेत रोड ठाणे येथे राहणाऱ्या एका महिलेची शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक Share Market Fraud करण्यास सांगून आर्थिक फसवून झाल्याची घटना समोर आली आहे. फिर्यादी महिलेने कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आरोपीचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. Thane Share Market Fraud News
महिलेला मोबाईलवर स्टॉक मार्केट Elite 22 व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करून वेबसाईट पाठवल्या. त्यानंतर त्या महिलेने वेबसाईट मार्फत शेअर ट्रेडिंग केल्यास अधिक नफा मिळाण्याचे आमिष दाखवून फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. महिलेला चार लाख 84 हजार 637 रुपयाचे ऑनलाईन ट्रान्सफर करण्यास सांगितले. त्यानंतर महिलेने एकूण रकमेपैकी 41 हजार 329 रुपये पर्यंत नफा म्हणून परत देण्यात आले. उर्वरित रक्कम 4 लाख 43 हजार 308 रुपये रक्कम भरत ना मिळाल्याने आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आले असता महिलेने कापूरवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली आहे. महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियमन 2000 चे कलम 66 (क) 66 (ड) भा.द.वि.कलम 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक काळे करत आहे. Thane Share Market Fraud News