Thane Crime News : मनी लॉन्ड्रींगची भीती दाखवून सात लाख रुपये लंपास ; महिलेची आर्थिक फसवणूक
•मनी लॉन्ड्रींगकरिता बँक खात्याचा वापर होत असल्याचे सांगून सायबर भामट्यांनी महिलेची ऑनलाईन आर्थिक फसवणूक
ठाणे :- कोलशेत रोड, ठाणे पश्चिम येथे राहणाऱ्या एका महिलेला एक अनोळखी कॉल करून तुमच्या बँक खात्यांचा वापर मनी लॉन्ड्रींगसाठी केला जात असल्याचे सांगितले. तुमच्या मोबाईल वरून मोठ्या प्रमाणावर अश्लील मेसेज आणि व्हिडिओ जात असल्याचे खोटे सांगून महिलेची तब्बल सात लाखांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची घटना ठाण्यात समोर आली आहे. महिलेने कापूरबावडी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
कापूरबावडी पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियम सन 2000 चे कलम 66 (ड), 66 (क) सह भारतीय न्यायसंहिता कलम 3(5),204 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कापूरबावडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 21 ऑगस्ट च्या दरम्यान कोलशेत रोड ठाणे पश्चिम येथे राहणाऱ्या 54 वर्षीय महिलेला एका अज्ञात व्यक्तीने कॉल करून सांगितले की, तुमच्या बँक खात्यावरून मनी लॉन्ड्रींग झाली आहे. तसेच अश्लील व बेकायदेशीर मेसेज जात आहे. असा खोटा कॉल करून या प्रकरणातून सुटण्याकरिता महिलेकडून तब्बल सात लाख रुपये ऑनलाईन वेगवेगळ्या बँकेच्या खात्यात पाठवण्यास सांगितले आणि आर्थिक फसवणूक केली आहे. महिलेने कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून या संपूर्ण घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश पुराणिक हे करत आहे.