Thane Crime News : रिक्षा चोरणाऱ्याला ठाण्यामधून अटक

•रिक्षा चोरून विक्री करणाऱ्या एका सराईत आरोपीला ठाणे गुन्हे शाखा कक्ष-1 पोलिसांनी अटक केली.चोरीच्या 3 रिक्षा जप्त
ठाणे :- रिक्षा चोरून विक्री करणाऱ्या एका सराईत आरोपीला गुन्हे शाखा कक्ष-1 पोलिसांनी अटक केली. या आरोपीच्या ताब्यातून पोलिसांनी तीन रिक्षा हस्तगत केल्या असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
गुन्हे शाखा, घटक-1 ठाण्याच्या पोलीसांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या अनुषंगाने त्यांनी, रघुवेल हॉटेल समोर, गोखले रोड, तीन हात नाका गौपाडा ठाणे येथुन एक संशयित इराम नामे उदय विलास साठे, (वय-32 रा.भीसले चाळ, सार्वजनिक शौचालयाचे जवळ, गोकूळ नगर ठाणे) यास ताब्यात घेवून त्याचेकडे केलेल्या तपासात, त्याने ठाणे शहरातील नौपाडा, राबोडी आणि उल्हासनगर-1 या भागातुन रिक्षा चोरल्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडुन चोरीच्या 3 रिक्षा जप्त केलेल्या आहेत.याप्रकरणी पोलिसांनी साठे याला अटक केली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
पोलीस पथक
अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, शोध-1, गुन्हे शाखा, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक-1, ठाणे वे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नाईक, पोलीस हवालदार महाडीक, पोलीस नाईक बडगुजर, पोलीस हवालदार सावंत यांनी केलेली आहे.



