Thane Crime News : कळव्यातील खुन प्रकरणाचे रहस्य उलगडण्यात पोलिसांना यश ; संशयित अटकेत
•Police succeeded in solving the murder case in Kalva अज्ञात संशयितांनी खून केल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेनंतर संशयित आरोपीने पलायन केले होते. या घटनेचा तपास करीत खुनाचे रहस्य उलगडले आहे.
ठाणे :- कळव्यात गेल्या 4-5 दिवसांपूर्वी 25-27 वर्षीय तरुणाचा कोणीतरी अज्ञात संशयितांनी खून केल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेनंतर संशयित आरोपीने पलायन केले होते. Thane Crime News परंतु, पोलिसांनी या घटनेचा तपास करीत खुनाचे रहस्य उलगडले असून अज्ञात कारणावरून राहुल उमा शशंकर प्रजापती (27 वय) यांचा खून झाल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
खून प्रकरणी भास्कर नगर कळवा पूर्व येथे राहणाऱ्या रमेश उर्फ बाला श्यामलाल माळी (28 वय) याला कळवा पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. राहुल याचा खून का केला याचे मुख्य कारण गुलदस्त्यात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 ऑक्टोबर च्या मध्यरात्री कळव्याच्या डोंगराच्या पायथ्याजवळ मृतदेह असल्याची तक्रार पोलिसांना मिळाली होती. कळवा पोलीस ठाण्यात Thane Crime News उमेशकुमार इंद्रजीत प्रजापती यांचा मुलगा राहुल उमेश कुमार प्रजापती याची हत्या झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.त्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात बी एन एस कलम 103 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांकडे कोणत्याही प्रकारे ठोस पुरावे नसताना. गुन्हे पथकाचे व गुंडाविरुद्ध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यादव पोलीस उपनिरीक्षक सागर सांगवे यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन कळवा परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. पोलीस हवालदार महाडिक आणि इतर पोलिसांच्या मदतीने बारकाईने पाहणी करून मयत सोबत आरोपी रमेश उर्फ बाला असल्याचे पोलिसांचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी रमेशची चौकशी केली असता त्यांने हा गुन्हा कबूल केल्याचे पोलीसांनी सांगितले आहे.Thane Crime News आता हा गुन्हा का केला याचा तपास पोलिसांकडून घेतला जात आहे. कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांनी आणि त्यांच्या पथकाने या गुन्ह्याचे रहस्य उलगडले.