ठाणे

Thane Crime News : दिवसा उघड्यावर शाळकरी मुलींवर विकृताचा हल्ला! पोलिसांची कारवाई, ‘तो’ आरोपी अखेर गजाआड!

•सावरकरनगरच्या गल्लीतील अत्यंत संतापजनक प्रकार; पाच अल्पवयीन मुलींना मानसिक धक्का

ठाणे | ठाण्यात सावरकरनगर परिसरात, दुपारच्या वेळेस शाळेत चाललेल्या पाच अल्पवयीन मुलींना टार्गेट करून एका विकृताने अश्लील वर्तन केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. यामध्ये पीडित मुलींनी धाडसाने पुढे येत तक्रार दाखल केली आणि वर्तकनगर पोलिसांनी चोख कामगिरी करत अवघ्या काही तासांत आरोपीला जेरबंद केलं.

फिर्यादी मुलीच्या म्हणण्यानुसार, त्या सर्व मुली शाळेत चालत जात असताना, एका अरुंद गल्लीमध्ये अनोळखी इसमाने पाठीमागून येत त्यांचा विनयभंग केला. हा इसम इतका धिटाईनं वागत होता की रस्त्यातून जाताना स्पष्टपणे अश्लील वर्तन करत होता. या प्रकाराने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली.

प्रकरण गांभीर्याचं असल्याने पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली 5 पोलीस ठाण्यांच्या विशेष पथकांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं. गुप्त माहितीच्या आधारे आरोपी शंकर केसरसिंह सोनी (वय 32) याला अटक करण्यात आली. तपासादरम्यान धक्कादायक बाब उघड झाली – त्याच्यावर यापूर्वीही कळवा पोलीस ठाण्यात अशाच स्वरूपाचा पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल आहे!

संपूर्ण मोहिमेत सहाय्यक पोलीस आयुक्त मंदार जवळे, वर्तकनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे, पोलीस निरीक्षक मल्हार कोकरे व महिला अधिकारी पल्लवी कोकाटे यांनी धडाडीने सहभाग घेतला. पुढील तपास पल्लवी कोकाटे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0