Thane Crime News : ज्येष्ठ नागरिकाची ऑनलाईन फसवणूक, 17 लाखाहून अधिक ऑनलाईन गंडा..
•Thane Crime News : शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक, ज्येष्ठ नागरिकांची 17 लाखाहून अधिक आर्थिक फसवणूक, कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
ठाणे :- ऑनलाइन फसवणुकीच्या घटनेमध्ये सातत्याने वाढ होत असताना एक घटना समोर येत आहे की ती म्हणजे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक परतावा मिळण्याच्या आशेने पैसे गुंतवणूक करणाऱ्यांची आणि त्यानंतर फसवणूक होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ठाण्यामध्ये ही एका ज्येष्ठ नागरिकांची ऑनलाइन फसवणूक झाली असून, तब्बल 17 लाखाहून अधिक पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून आर्थिक फसवणूक झाली आहे. ज्येष्ठ नागरिकाने कापूरबावडी पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे.
17 लाख 77 हजार रुपयाची फसवणूक..
राजीव लक्ष्मीकांत जयवंत (62 वर्ष) सेवानिवृत्ती असून ते ठाण्याच्या कापूरबावडी परिसरात राहत आहे. त्यांना एका व्यक्तीने शेअर मार्केटमध्ये म्हणजेच अपर सर्किट ट्रेडिंग तसेच ब्लॉक ट्रेडिंग करण्याकरिता काही रक्कम गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळेल असे सांगण्यात आले. त्या ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या बँक खात्यावरून ऑनलाईन सतरा लाख 77 हजार रुपयाची गुंतवणूक केली, कोणत्याही प्रकारे आर्थिक परतावा न मिळाल्याने आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियमन सन 2000 चे कलम 66 (क) (ड) सह भा.द.वि.कलम 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सावळे हे करत आहे.