Thane Crime News : सायबर गुन्हेगारांचा फसवणुकीचा नवा प्रकार..’कुरिअर स्कॅम’
•सणासुदीच्या दिवसांत राज्यात सायबर गुन्हेगारांच्या टोळ्या सक्रिय झाल्या असून त्यांनी फसवणुकीचा नवा प्रकार शोधून काढला आहे. कुरिअर फसवणुकीमध्ये महिलेची 17 लाखांची फसवणूक
ठाणे :- सणासुदीच्या दिवसांत राज्यात सायबर गुन्हेगारांच्या टोळ्या सक्रिय झाल्या असून त्यांनी फसवणुकीचा नवा प्रकार शोधून काढला आहे. ठाण्यात राहणाऱ्या 31 वर्षीय महिलेची तब्बल 17 लाखांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. तैवान येथे पाठवलेल्या कुरिअर मध्ये एम.डी आणि एम ए ड्रग्ज सापडले असून नार्कोटेक्स विभागात त्याविरुद्ध कम्प्लेंट केली आहे असे सांगून महिलेची फसवणूक झाल्याची तक्रार कापूरबावडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियमन कलम 66 (ड), 66 (क) भारतीय न्याय संहिता कलम 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कापूरबावडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाण्याच्या ढोकाळी परिसरात राहणाऱ्या 31 वर्षीय महिलेला एका अनोळखी व्यक्तीने कॉल करून तुम्ही तैवान देशात पाठवलेल्या कुरिअरमध्ये एमडी आणि एमए ड्रग्ज सापडले असून तुमच्या विरोधात नार्कोटिक्स विभागात पोलीस तक्रार करण्यात आली आहे असे सांगितले. त्यानंतर एक व्यक्तीने कोटीक्स डिपार्टमेंट मधुन पोलीस बोलत असल्याचे सांगुन व्हेरिफिकेशसाठी स्काईप हे ॲप फिर्यादी यांना डाउनलोड करण्यास सांगितले. व्हिडीओ कॉल करून कायदेशीर कारवाईपासुन वाचण्यासाठी फिर्यादीस ICICI बँक खात्यातुन एकुण 17 लाख रूपये लोन घेण्यास भाग पाडले . ती सर्व रक्कम ऑनलाईन पध्दतीने आरोपीने स्वीकारून त्यांची आर्थिक फसवणुक केली आहे. या संपूर्ण गुन्ह्याचा पुढील तपास कापूरबावडी पोलिसांकडून केला जात आहे.