Thane Crime News Mumbra police Seized Gun from criminal : मुंब्रा पोलिसांचे कारवाई ; 2 गावठी बंदुका,3 जिवंत काडतुसे,1 मॅगझीन, तरुणांकडून जप्त
ठाणे :- राज्यातील लोकसभेच्या निवडणुका अंतिम टप्प्यावर आले असताना शहरातील कायदा सुव्यवस्था अतिशय काटेकोरपणे पाळले जात आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे त्यासाठी वारंवार पोलिसांकडून नाकाबंदी, अवैध धंद्याविरोधात कारवाईचा बडगा उभारला आहे. पोलिसांनी एका तरुणाला बेकायदेशीर रित्या (पिस्टल) गावठी बंदूक बाळकडल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. तरुणाच्या ताब्यातून दोन गावठी पिस्टल, तीन जिवंत काडतुसे,1 मॅगझीन अंगझडतीतुन जप्त केले आहे. Thane Crime News
मुंब्रा पोलीस ठाणेचे पोलीसांना मिळालेल्या माहिती वरून, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंभार, पोलीस शिपाई विरकर व त्यांचे पथकाने, दि.05 मे रोजी सकाळी 07.55 वा.चे सुमारास, रेतीबंदर कडून मुंब्रा कडे जाणा-या सव्र्हिस रोडवरील, अंपग स्टाॅलजवळ, मुंब्रा येथे आरोपी उत्तम पितांबर पुनिया, (23 वर्षे) (रा.धनीरवास, हरियाणा राज्य) यास ताब्यात घेवुन त्याची अंगझडती घेतली असता, त्याचे ताब्यात 2 गावठी बनावटीचे लोखंडी बाॅडी असलेले पिस्टल (अग्नीशस्त्र), 1 मॅगझीन, 3 जिवंत काडतुस, असा मुद्देमाल मिळुन आला. प्रकाराबाबत सरकार तर्फे दिलेल्या फिर्यादी वरून आरोपीविरूध्द गुन्हा भारतीय हत्यार कायदा कलम 3,25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1), 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, आरोपीस अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंभार हे करीत आहेत.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…