Thane Crime News : सुनेला जाळल्याप्रकरणी सासूला जन्मठेपेची शिक्षा
•क्षुल्लक कारणावरून सुनेच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून देऊन ठार मारल्याप्रकरणी त्या महिलेची सासू जमानाबेन मंगलदास मंगे हिला
ठाणे :- क्षुल्लक कारणावरून सुनेच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून देऊन ठार मारल्याप्रकरणी त्या महिलेची सासू जमानाबेन मंगलदास मंगे (71 वय) हिला अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी एस देशमुख यांनी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात जन्मठेप शिक्षा सुनावली आहे. 2018 मध्ये सुन दक्षता अशोक मंगे (30 वय) सासू कडून शारीरिक व मानसिक त्रास दिला जात होता. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात आरोपी सासूच्या विरोधात 2018 मध्ये भादवि कलम 302, 498 (अ),34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तात्कालीन तपास अधिकारी महिला पोलीस निरीक्षक एस व्ही देशपांडे (गुन्हे) यांनी न्यायालयासमोर भक्कम पुरावे सादर केल्याने हे कृत्य केल्याप्रकरणी आरोपी महिला जमानाबेन मंगलदास मंगे हिला जन्मठेप आणि पन्नास हजार रुपयांच्या दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
सरकारच्या वतीने सरकारी अभियोक्त्या संध्या म्हात्रे, तत्कालीन तपासी अधिकारी महिला पोलीस निरीक्षक एस.व्ही. देशपांडे (गुन्हे), वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे, पोलीस हवालदार सावळे,गावीत, पोलीस अंमलदार अमोल सडेकर यांनी अथक परिश्रम करून न्यायालयात ठोस पुरावे केले त्यामुळे गुन्हयातील आरोपीला दोषी ठरविण्यात यश आले आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे पोलिसांच्या उत्कृष्ठ कामगिरीबाबत समाजातील सर्व स्तरातुन पोलीसांचे कौतुक होत आहे.