ठाणे

Thane Crime News : ठाण्यात ‘एमडीचा पेडलर’ जेरबंद! 1.69 कोटींचा अंमली साठा पोलिसांच्या जाळ्यात”

•मुंब्रा बायपासवर सापळा, कारमधून ‘ड्रग्सचा खजिना’; गुन्हे शाखा घटक-1 ची धडाकेबाज कारवाई

ठाणे :- ठाणे शहरातील गुन्हे शाखा, घटक-1 च्या पथकाने एका मोठ्या ड्रग तस्कराला जेरबंद करत तब्बल 1 कोटी 69 लाख 26 हजार रुपयांचा ‘एमडी’ (मेफेड्रोन) अंमली पदार्थ जप्त केला आहे. आरोपी मोहनलाल जोशी उर्फ शर्मा (वय 55, रा. प्रगतीनगर, कुडूस, पालघर) याला कारसह अटक करण्यात आली असून, शहरातील अंमली तस्करीच्या जाळ्यावर ठाणे पोलिसांनी घणाघात केला आहे.

ही फिल्मी थराराला मागे टाकणारी कारवाई दिनांक 18 जुलै रोजी मुंब्रा बायपास उड्डाणपुलालगत करण्यात आली. पोलीस सूत्रांना मिळालेल्या खबरीनुसार, एक संशयास्पद व्यक्ती मारुती SX4 (MH-48-A-3126) कारमधून एमडी ड्रग घेऊन जाणार असल्याची माहिती मिळताच पथकाने व्यूहरचना करत सापळा रचला.

कारला थांबवून तपासणी केली असता कारमध्ये 1 किलो 209 ग्रॅम वजनाचा, तब्बल 1.69 कोटींचा एमडी साठा आढळून आला. आरोपी मोहनलालकडे याबाबत विचारणा केली असता समाधानकारक उत्तर न दिल्याने तात्काळ अटक करण्यात आली. सदर प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात NDPS कायद्यानुसार कलम 8(क), 22(क) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऑपरेशन क्लीन’चे नेतृत्व – पोलिसांचा फुल फोर्स खेळ

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त अमरसिंह जाधव, तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली अमित यादव सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश शिरसाठ पोलीस उपनिरीक्षक दयानंद नाईक, दीपक जाधव, भरत आरवंदेकर, महिला पोलीस तेजश्री शेळके, आणि इतर अनुभवी पोलीस कर्मचाऱ्यांनी अत्यंत धाडसी आणि नेटका सापळा आखून कारवाई फत्ते केली.

vivek

Recent Posts