•ठाणे गुन्हे शाखेची कारवाई; उत्तराखंडमधून 18.54 लाखांचा साठा जप्त
ठाणे | ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनीट-5 ने अमली पदार्थांच्या गोरखधंद्याचा पर्दाफाश करत उत्तराखंडमधील एमडी तयार करणाऱ्या फॅक्टरीवर धाड टाकून सुमारे 18 लाख 54 हजार रुपयांचा अमली साठा जप्त केला आहे. याप्रकरणी नेपाळमध्ये पळून जाण्याच्या तयारीत असलेले ओम गुप्ता, भिम यादव आणि अमरकुमार कोहली या तिघांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना 5 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणाचा उगम महिन्याभरापूर्वी ठाण्यातील घोडबंदर परिसरात झाला होता. तिथे अमली पदार्थांची तस्करी करताना विशाल सिंह आणि मल्लेश शेवला या दोघांना अटक करून पोलिसांनी 10.93 ग्रॅम एमडी जप्त केला होता. चौकशीत त्यांनी उत्तराखंडमधून हे अमली पदार्थ आणल्याची कबुली दिली होती.
पोलिसांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथकं तयार केली. पहिल्या पथकाने मेलतोडा (उत्तराखंड) येथे जाऊन तपास केल्यानंतर तेथील एमडी फॅक्टरीवर 27 जून रोजी छापा टाकण्यात आला. दुसऱ्या पथकाने टनकपुर परिसरातून फरार आरोपींना पकडले, जे त्या वेळी नेपाळमध्ये घुसखोरीसाठी तयारीत होते.
या कारवाईने अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून ठाणे गुन्हे शाखेच्या कार्यक्षम तपासामुळे आणखी संशयित आरोपींचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…