Thane Crime News : Afflux Capital कंपनीकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक ; पोलिसांकडून गुंतवणूकदारांना आवाहन
Thane Police Advice Be Aware From Afflux Capital Scam : ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून आवाहन,Afflux Capital कंपनीमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारातकरिता महत्त्वाचे, कागदपत्र सादर करण्यास पोलिसांकडून आवाहन.
ठाणे :- आर्थिक गुन्हे शाखा ठाणे Thane Crime Branch यांच्याकडून गुंतवणूक दाराकांना खास आवाहन करण्यात आले आहे की,Afflux Capital कंपनीमध्ये ज्या गुंतवणूकदारकाने आपली आर्थिक गुंतवणूक केली आहे तसेच त्या संदर्भातले कोणतेही कागदपत्र आपल्याजवळ असल्यास त्यांनी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे Mumbai Crime Branch शाखेच्या पोलीस निरीक्षक राजू सोनवणे यांना कागदपत्र सादर करण्यास सांगितले आहे. Thane Crime Latest News
Afflux Capital राजहंस बिल्डींग, चौथा मजला राजमल लखीचंद ज्वेलर्सच्यावर गांवदेवी मंदिर रोड, ठाणे (प.) या संस्थेच्या माध्यमातुन, गुंतवणुक रक्कमेवर दर दिवशी 0.5 ते 1 टक्के निश्चित परतावा मिळेल आणि 10 ते 20 महिन्यात गुंतवणुक रक्कम तिप्पट मिळेल असे अशक्यप्राय गुंतवणुक योजनेचे आमिष दाखवुन गुंतवणुकदारांकडून गुंतवणुक रक्कम स्विकारून सदर रक्कमेचा स्वतःचे फायद्याकरिता गुंतवणूकदारांची फसवणुक आहे.Afflux Capital, या वित्तीय संस्थेचे संचालक 1.विजय केशव यादव, 2.अमित हर्षद जैन आणि 3.श्री महाकाली को. ऑप. क्रेडीट सोसायटी, पवई, मुंबई या संस्थेचे चेअरमन रितेश दिलीपकुमार शिकलीगर उर्फ रितेश पांचाळ यांचेविरूध्द, दिनांक 10 ऑगस्ट 2022 रोजी नौपाडा पो.स्टे. ठाणे येथे भा.दं.सं. कलम 406,409,420,34 सह महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंधाचे सरंक्षण अधिनियम 1999 चे कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. गुन्हयाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा ठाणे शहर यांचेकडून करण्यात येत आहे. Thane Crime Latest News
Web Title : Thane Crime News: Massive Financial Fraud by Afflux Capital Company; Police appeal to investors