Thane Crime News : सोन्याच्या दागिन्यांची हेराफेरी, आरोपी माउंट आबू पर्वतरांगात, दृश्यम सिनेमाचा आधार
•Thane Crime News नौपाडा पोलिसांची कामगिरी ; आरोपीला जंगलातून अटक, ज्वेलर्स मध्ये ऑफिस बाॅय काम करणारा निघाला सराईत चोर, मास्टर माईंड प्लॅनिंग
ठाणे :– दृश्यम सिनेमा मध्ये ज्याप्रमाणे पुरावे नष्ट करण्याकरिता सिनेमाचा हिरो अजय देवगन चालाकी करत असतो त्याचा प्रत्यय ठाण्याच्या नौपाडा पोलिसांच्या हद्दीत घडलेल्या घटनेवरून समोर आला आहे. विरासत ज्वेलर्स नावाच्या दुकानांमध्ये ऑफिस बॉय म्हणून काम करणाऱ्या एका तरुणाने तब्बल एक कोटी तीस लाख किमतीचे सोन्याचे दागिने चोरी करून माउंट आबू पर्वतरांगाच्या जंगलामध्ये जाऊन लपला होता. पोलिसांनी मोठ्या शिताफीने सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे.
सोन्याच्या दागिनेची हेराफेरी
यशवंत घेवरचंद पुनमिया यांच्या विरासत नावाच्या ज्वेलर्सच्या दुकानात काम करणाऱ्या ऑफिस बॉय म्हणून विशाल सिंग कामसिंग राजपूत (29 वर्ष) याने मोठ्या हेराफेरी ने सिद्धार्थ ज्वेलर्स 2 विरासत ज्वेलर्स येथे आणण्यासाठी दिलेले सोन्याचे दागिने सेल्समॅन चे नजर चुकवत फेकून एक कोटी तीस लाख 14 हजार 720 रुपयांचे 1807.600 ग्रॅम वजनाचे दागिने घेऊन लंपास झाला. घडलेल्या घटनेबाबत पुनमिया यांनी नौपाडा पोलिसांना ठाण्याच्या भा.द.वि कलम 381,408 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.
वरिष्ठांच्या सूचना आरोपीचा तपास
अप्पर पोलीस आयुक्त विनायक देशमुख, पोलीस उप आयुक्त सुभाष बुरसे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन पोलीस निरीक्षक गुन्हे शरद कुंभार यांनी आरोपीचा तपास घेण्याकरिता सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश भांगे यांना सूचना दिल्या होत्या. पोलिसांच्या तपासात पहिली माहिती हाती लागली की यापूर्वी आरोपीने त्याच्या साथीदारासह अशाच प्रकारे रोख रक्कम चोरी केल्याचे घटना समोर आले तसेच त्याच्या विरोधात एलटीडी मार्ग पोलीस ठाणे मुंबई येथे 381 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सिनेमाचा आधार घेऊन आरोपीची चोरी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
आरोपीने ठाणे शहर ते वसई रोड येथे जाण्याकरिता तब्बल आठ ते दहा रिक्षा बदलून एका सिनेमाचा आधार घेत हे कृत्य केल्याचे पोलिसांच्या निदर्शनात आले आहेत. तसेच अहमदाबाद येथे जात असताना पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने आणि पोलिसांना दिशाभूल करण्याच्या हेतूने वापरत असलेला मोबाईल हा मुंबईच्या दिशेने जाणारे एका ट्रक मध्ये टाकून दिला तसेच तो वापरत असलेल्या मोबाईल हा क्रमांक सोलापूरच्या माथाडी कामगारांचा असलेला पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी जवळपास 100 वरून अधिक सीसीटीव्हीचा फुटेज आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होते परंतु आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले आहे.
माउंट आबू पर्वताच्या जंगलात आरोपी निवासी
आरोपी हा फरार झाला असून तो त्यादरम्यान जैयसलमेर, पालनपूर, जोधपूर, डिसा, बिकानेर, उदयपूर, जयपूर, माउंट आबू पर्वत, अहमदाबाद, बनसाकांटा, गुजरात, राजस्थान अशा वेगवेगळया ठिकाणी रात्री बसने प्रवास करून, दिवसभर एखाद्या निर्जन ठिकाणी जावून फिरत होता. तो पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न करत होता. पोलिसांकडून आरोपींच्या नातेवाईक मित्रमंडळी आणि पत्नी यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून होते. ते असताना दोन जून 2024 रोजी आरोपी हा माउंट आबू पर्वतरांगाच्या राजस्थान येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने राजस्थान येथे रवाना होऊन तेथील सार्वजनिक ठिकाणी लॉजेस,वाहन तळ, बस डेपो, धर्मशाळा येथे पाहणी करत असताना आरोपी हा माउंट आबू या जंगलात लपलेला आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी वेशांतर करून जंगलामध्ये फिरण्यास सुरुवात केली असता पर्वतरांगाच्या एका भागात आरोपी दिसला आणि पोलिसांनी त्याला अटक केले. पोलिसांनी आरोपीला सात जून रोजी दुपारी सव्वा दोन च्या दरम्यान अटक केली असून न्यायालयासमोर हजर केले असता आरोपीला 12 जून 2024 पर्यंत पोलीस कोठडी सोनवण्यात आली आहे. तसेच आरोपीने आपल्या कबूल नाम्यामध्ये सदर दुकानातील केलेल्या सोनाच्या हेराफेरी बाबत कबुली दिली आहेत तसेच चोरी केलेले दागिने त्याच्यातून पैसे मिळालेले आमदाबाद येथे घर घेऊन राहण्याचा त्याचा उद्देश होता. पोलिसांनी आरोपीकडून एक कोटी 10 लाख रुपयांचे 1745.80 सोन्याच्या दागिने जप्त केले आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.
पोलीस पथक
पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सह पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रा. विभाग विनायक देशमुख, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 1, सुभाष बुरसे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे नौपाडा विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद कुंभार, पोलीस निरीक्षक सुनिल तांबे (प्रशासन) यांचे मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी मंगेश भांगे, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय लोंढे, संगम, पाटील मकानदार, पोलीस हवालदार गायकवाड, पाटील,देसाई, रांजणे, गोलवड, तडवी, विरकर, पोलीस नाईक माळी, पोलीस शिपाई कांगणे, तिर्थकर, यांनी केलेली असुन माउंट आबू च्या जंगलात लपलेला आरोपीला अटक केली आहे.