ठाणेक्राईम न्यूज

Thane Crime News : कापूरबावडी पोलिसांची कारवाई ; बेकायदेशीररित्या देशी पिस्टल (बंदूक) जवळ बाळगल्या प्रकरणी एकाला अटक

•कापूरबावडी पोलिसांनी आरोपीकडून एक देशी बनावटीचे पिस्टल (बंदूक) जप्त करण्यात आली आहे

ठाणे :- राज्यात निवडणुकीचे Loksabha Election वारे वाहू लागले असून पहिल्या टप्प्यातील मतदान संपन्न झाले आहे. मुंबई ठाण्यात Thane Crime News रायगड आणि इतरत्र ठिकाणी वीस मेला मतदान होणार असून तत्पूर्वी पोलिसांनी राज्यात प्रत्येक पोलीस आयुक्तालयातील हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावे याकरिता पोलिसांनी अवैधरित्या धंदे करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उभारला आहे.

कापुरबावडी पोलीस ठाणेचे पोलीसांना Thane Crime News मिळालेल्या माहिती वरून, सहाय्यक पोलीस निरीक्षक पिंपळे, पोलीस हवालदार जाधव व त्यांचे पथकाने, 22 एप्रिल रोजी 8.38 वा.चे सुमारास, सेंट सेव्हियर्स शाळेजवळ, जी.बी.रोड, ठाणे पश्चिम येथे आरोपी रवि माधव हनवते, (31 वर्षे) (रा.फिरस्ता वाघबीळ ब्रीजखाली, ठाणे पश्चिम) यास ताब्यात घेवुन त्याची अंगझडती घेतली असता, त्याचे ताब्यात 1 देशी बनावटीचे पिस्टल (अग्नीशस्त्र) व टीव्हीएस कंपनीची स्कुटर असा मुद्देमाल मिळुन आला. प्रकाराबाबत सरकार तर्फे दिलेल्या फिर्यादी वरून आरोपीविरूध्द भारतीय हत्यार कायदा कलम 3,25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1),135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, आरोपीस अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पिपंळे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0