क्राईम न्यूज

Thane Crime News : ठाण्यात आंतरराज्यीय ‘बंटी-बबली’ टोळी जेरबंद!

Thane Latest Crime News : 10 लाखांचा मुद्देमाल हस्तगत; ठाणे, पुणे, नवी मुंबईतील 8 घरफोडींचे गुन्हे उघडकीस

ठाणे :- एका आंतरराज्यीय घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून ठाणे गुन्हे शाखेने Thane Crime Beanch मोठी कामगिरी बजावली आहे. ‘बंटी-बबली’ स्टाईलने चोरी करणाऱ्या या टोळीला पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून 10 लाख 40 हजार 180 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या टोळीच्या अटकेमुळे ठाणे, नवी मुंबई, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर अशा विविध शहरांतील 8 घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे. Thane Latest Crime News

या टोळीने 15 जुलै रोजी राबोडी येथील एका सिगारेट गोदामातून तब्बल 51 लाख रुपयांचा माल लंपास केला होता. गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी गोदामातील डीव्हीआर मशीनही सोबत नेले होते. मात्र, गुन्हे शाखा घटक-1 च्या पथकाने हार मानली नाही. त्यांनी परिसरातील 150 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले.

पोलिसांची तपास मोहीम: चोरीच्या वाहनांचा वापर आणि चकमा देण्याची पद्धत

आरोपींनी पोलिसांना चकमा देण्यासाठी चोरीच्या स्कूटर आणि टेम्पोचा वापर केला होता. गोदामाजवळून चोरी केलेल्या वाहनांतून त्यांनी माल भरला आणि नंतर ती वाहने सोडून दिली. पोलीस उपनिरीक्षक दयानंद नाईक आणि पोलीस हवालदार संदीप महाडीक यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणात आरोपी मिरारोड परिसरात गेल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे महेंद्रकुमार मेघवाल, राजेश कदम आणि गणेश पाटीदार या तिघांना अटक केली.

या आरोपींनी गुन्हा करताना सिगारेटचे गोदाम फोडणे, रोख रक्कम, चांदीच्या मूर्ती आणि वाहने चोरल्याचे कबूल केले. त्यांच्याकडून एकूण 10 लाख 49 हजार 180 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, ज्यात सिगारेट, रोख रक्कम, चांदीच्या वस्तू आणि एक होंडा ॲक्टिव्हा स्कूटरचा समावेश आहे. या टोळीने गुन्ह्यांसाठी वाहने चोरून ती वापरली आणि नंतर ती सोडून दिली, अशी त्यांची कार्यपद्धती असल्याचे तपासात उघड झाले आहे. आरोपी राजेश कदमवर यापूर्वी 24, तर महेंद्रकुमार मेघवालवर 14 गुन्हे दाखल आहेत.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

4 hours ago