•चार ठिकाणी छापे; पाच जणांना अटक,54 लाखांचा ‘एम.डी.’ आणि गांजा जप्त
ठाणे | ठाणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कामगिरी करत चार वेगवेगळ्या ठिकाणी एकाचवेळी छापेमारी करून अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या पाच जणांना अटक केली आहे. या कारवाईत 157.3 ग्रॅम एम.डी. (Mephedrone) व 41 किलो 974 ग्रॅम गांजा असा एकूण 54 लाख 46 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गुन्हे शाखेच्या या धडक मोहिमेमुळे ठाणे जिल्ह्यात अंमली पदार्थ विक्री करणार्या टोळ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ही कारवाई उल्हासनगर, डोंबिवली, कळवा आणि मुंब्रा या ठिकाणी करण्यात आली. संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वेगवेगळ्या ठिकाणांवरील कारवायांचा आढावा
1.उल्हासनगर (हिललाईन पो.स्टे.)
जय संजय रेवगडे आणि साहिल किरण कांगणे यांच्याकडून 85 ग्रॅम एम.डी. जप्त. एकूण किंमत – 16.72 लाख
2.डोंबिवली (मानपाडा पो.स्टे.)
कल्पेश निंबाळकर आणि आशिष आंबोकर यांच्या ताब्यातून 72.2 ग्रॅम एम.डी. हस्तगत. एकूण किंमत –14.44 लाख
3.कळवा (कळवा पो.स्टे.)
ओडिशातील राजेंद्र महंतकडून 40 किलो गांजा पकडला. किंमत 12.16 लाख
4.मुंब्रा (मुंब्रा पो.स्टे.)
– शोएब शेख याच्याकडून 1.43 किलो गांजा जप्त. किंमत 43 हजार रुपये.
या यशस्वी कारवाईसाठी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रतिबंध) विनय घोरपडे, तसेच अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के यांचे नेतृत्व लाभले. पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, पोलीस उपनिरीक्षक निकम, पोलीस हवालदार तावडे, वासरवाड, महाले, देसाई, सोनगिरे यांचा सक्रिय सहभाग होता.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…