Thane Crime News : गावठी बॉम्बची विक्री करणारा ठाण्यातून अटकेत, वाई कनेक्शन!
• गावठी बॉम्ब विक्री करण्यासाठी आलेल्या व्यक्तीला ठाणे पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने एकाला अटक केल्यानंतर मुख्य सूत्रधारांना वाईतून अटक केली.
ठाणे :- रानडुकरांच्या शिकारीसाठी वापरले जाणारे गावठी बॉम्ब विक्री करण्यासाठी आलेल्या व्यक्तीला ठाणे पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने साकेत रोड ठाणे या ठिकाणी 2 डिसेंबरच्या दरम्यान अटक केली. सुभाष गजानन पहेलकर,( वय 45,) असे या व्यक्तीचे नाव असून तो मानगाव, जिल्हा रायगड येथील राहणारा आहे.त्याच्याकडील 10 हजार रुपये किंमतीचे 10 गावठी बॉम्ब रंगेहाथ पकडण्यात आले होते.
आरोपी सुभाष पहेलकर याचेकडे केलेल्या चौकशीमध्ये त्याने बॉम्ब हे वाई, जिल्हा सातारा येथून विक्री करण्यासाठी आणल्याचे सांगितले. त्याप्रमाणे मध्यवर्ती गुन्हे शोध कक्षाचे पोलीस उपनिरीक्षक दिपक पाटील व पथकाने वाई पोलीस ठाण्याच्या स्थानिक पोलीसांच्या मदतीने कारवाई करून आरोपी पालिश सिकरे, (वय 37 ) आणि त्याची पत्नी मुरलीबाई पालिश सिकरे, (वय 35) दोन्ही मुळ (राह. गांव-कुडो, तालुका-हरदुआ, जिल्हा-कटनी, राज्य – मध्यप्रदेश) सध्या मेढा सातारा यांच्या ताब्यातुन 2 लाख 82 हजार, किंमतीचे 282 जिवंत गावठी बॉम्ब हस्तगत केले आहेत. तिन्ही आरोपी यांचेकडून मध्यवर्ती गुन्हे शोध कक्षाचे पोलीस पथकाने एकुण 292 जिवंत गावठी बॉम्ब सह त्यांचे मोबाईल आणि रोख रक्कमसह एकुण 3 लाख 11 हजार 500 रुपयांच्या मुद्देमाल हस्तगत केला असुन त्यांचे विरूध्द राबोडी पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम-288 सह बारी पदार्थ अधिनियम 1908 (The Explosive Substance Act 1908) चे कलम 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हयामध्ये तीनही आरोपीनां अटक करण्यात आली असून गुन्हयाचा तपास मध्यवर्ती गुन्हे शोध कक्ष, ठाणे शहर हे करीत आहेत.
पोलीस पथक
पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त राजकुमार डोंगरे (शोथ-२) यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे शोध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे, पोलीस उपनिरीक्षक दिपक पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुरेश माळोदे, पोलीस हवालदार धनराज घोडके, धनंजय ठोमरे, प्रकाश मोरे, जितेंद्र खलाटे, नासीर सैय्यद, महिला पोलीस हवालदार वैष्णवी परांजपे, पोलीस नाईक दिनकर सांवत, अंकुश शिंदे, महिला पोलीस नाईक पुनम घार्गे, पोलीस अंमलदार रोहन म्हात्रे, विकास चेमटे यांचे पथकाने केली आहे.