•ज्येष्ठ नागरिकाची 1.14 कोटींची फसवणूक; दिल्ली येथील कॉल सेंटर पर्दाफाश
ठाणे :- बजाज फायनान्स कंपनीतून बोलत असल्याची बतावणी करून शून्य टक्के दराने कर्ज मंजुरीच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाला गंडा घालणाऱ्या दिल्ली येथील बनावट कॉल सेंटरचा सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.त्यांच्याकडून 105 मोबाइल,1 लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत.पोलिसांनी शेहजाद लाल मोह. खान उर्फ रेहमान (वय 30),अनुज उत्तमसिंग रावत उर्फ अनिल कुमार यादव (वय 30),मोह. आमिर हुसेन ( वय 34) यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,बजाज फायनान्स, दिल्ली येथून बोलत असल्याचे सांगून बजाज फायनान्सकडून जेष्ठ नागरिक म्हणून शून्य टक्के व्याजदराने लोन मिळवून देण्याचे आमिष दाखवून बजाज फायनान्स तसेच येस बँकेचा लोगो व स्टॅप असलेली बनावट ईलेक्ट्रोनिक कागदपत्रे बनवून ती तक्रारदार यांना पाठवून त्यांचा विश्वास संपादन करून विविध कारणे देवून वेगवेगळया बँक खात्यात एकूण रू. 1 कोटी 14 लाख इतकी रक्कम भरणा करण्यास भाग पाडून आर्थिक फसवणुक केली.
तांत्रिक तपास करुन सायबर पोलीस ठाणे, पश्चिम विभाग, गु.शा. मुंबई येथील पथकाने या बजाज फायनान्सच्या नावाखाली लोन मिळवून देण्याचे बनाव करणा-या दिल्ली येथील Maximiser Marketing (OPC) Private Limited, Aanad Vihar, Hari Nagar, New Delhi या कॉल सेंटरवर सलग दोन दिवसरात्र पाळत ठेवून तेथे धाड टाकून सदर गुन्हयातील मुख्य आरोपींनाशिताफीने अटक केली आहे.गुन्हयाच्या प्राथमिक तपासामध्ये असे निष्पन्न झाले आहे की, मोबाईलफोन हे नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टीग पोर्टलवर देशभरातील एकूण 132 सायबर गुन्हयांमध्ये वापरले असल्याचे निदर्शनास आले असून त्याव्दारे लोकांची करोडो रूपयांची फसवणुक केली असल्याचे निष्पन्न झाले आहे.
पोलीस पथक
पोलीस आयुक्त विवेक फणसळकर,विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शशिकुमार मिना, पोलीस उप आयुक्त, सायबर गुन्हे, दत्ता नलावडे, सहायक पोलीस आयुक्त, सायबर विभाग,राजेंद्र शिरतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम प्रादेशिक सायबर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ताराम चव्हाण यांच्या नियत्रंणाखाली तसेच दिल्ली गुन्हे शाखा व 14C पथक यांचे मदतीने सायबर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक मंगेश मजगर, सपोनि पुनम जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाचंगणे, पोलीस उपनिरीक्षक दिपक तायडे, पोलीस हवालदार सचिन सावंत, पोलीस शिपाई केशव तकीक, अमोल फाफळे, दिपक पडळकर, पोलीस शिपाई राहुल भडांगे, प्रितम व्यवहारे यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…