•Thane Share Market Crime News शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यास सांगून आर्थिक फसवणूक, कापुरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
ठाणे :- ऑनलाइन आर्थिक फसवणूक झालेल्या घटना सातत्याने समोर येत आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून फसवणूक होत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहे. लोकं आर्थिक आमिषाला बळी पडत आहे. अशातच ठाण्याच्या कोलशेत रोड येथे राहणाऱ्या एका व्यक्तीला तब्बल 19 लाखाहून अधिक किंमतीचे आर्थिक फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून फसवणूक झाल्याची फिर्यादी यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये सांगण्यात आले आहे. Thane Crime News
शेअर मार्केटच्या नावाने ऑनलाईन फसवणुकीचा बळी
शैलेश सुभाषचंद्र तिवारी (33 वर्ष) हे ठाणे पश्चिम येथील कोळशेत रोड येथे राहत आहे. त्यांचे फेसबुक वरून अनोळखी व्यक्तीने अनोळखी साथीदाराच्या मदतीने एका व्हाट्सअप ग्रुप वर ऍड करून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळू शकतो असे सांगण्यात आले होते. अधिक परतावाच्या आमिषाला बळी पडत तिवारी यांनी एकूण 19 लाख 86 हजार रुपये गुंतवणूक केले होते. परंतु गुंतवणूक केलेले रक्कम कोणत्याही आर्थिक परतावा न मिळाल्याने आपली आर्थिक फसवणूक झाल्याची लक्षात आले. त्यानंतर फिर्यादी तिवारी यांनी कापुरबावडी पोलीस ठाण्यात घडलेल्या घटनेबाबत तक्रार केली त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियमन सन 2000 चे कलम 66 (क) (ड) सह भादवि कलम 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ए एल साळवी हे करत आहे. Thane Crime News
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…