Thane Crime News : शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक! आमिषाला बळी तब्बल 45.88 लाख रुपयांची ऑनलाइन चोरी
•सावधान! शेअर मार्केटच्या ट्रेडिंगकरिता हा ॲप डाऊनलोड केल्यास तुमची बँक होणार खाली
ठाणे :- शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग खाते उघडून पैसे गुंतविल्यास कमी दिवसांत चांगला परतावा मिळेल, असे आमिष सायबर गुन्हेगारांकडून लोकांना दाखविले जात आहे. सुरुवातीला थोड्या रक्कमेचा परतावा लगेचच दिला जातो, जेणेकरून समोरील व्यक्ती विश्वास ठेवून जास्त पैसे गुंतविण्यास तयार होईल. मात्र, मोठी रक्कम हाती लागल्यानंतर सायबर गुन्हेगार ना मुद्दल ना जादा परतावा देतात अशी वस्तुस्थिती आहे. अशीच एक घटना ठाण्याच्या पातलीपाडा परिसरात राहणाऱ्या 54 वर्षीय महिलेसोबत घडली आहे. एक-दोन नाही तर तब्बल 44 लाख 88 हजार 605 रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाली आहे. शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग करणे महिलेच्या बँक खाते खाली करण्यास कारणीभूत ठरले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पातलीपाडा ठाणे परिसरात राहणाऱ्या एका 54 वर्षीय महिलेला अज्ञात व्यक्तींनी कॉल करून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास अधिकचा नफा मिळाण्याचे आमिष दाखविले आहे. त्यानंतर महिलेला दोन व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करून SMS Global Securities हे ॲप डाऊनलोड करण्याकरिता लिंक पाठवली. ती लिंग डाऊनलोड केल्यास शेअर मार्केट करीता 44 लाख 88 हजार 605 रुपये रक्कम बँक खातेतून आरोपी यांच्या खात्यावर ऑनलाईन पाठविण्यास सांगितले. परंतु कालांतराने कोणत्याही प्रकारची रक्कम परत अथवा त्याचे व्याज न मिळाल्याने आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येतात त्यांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.माहिती तंत्रज्ञान अधिनियमन सन 2000 चे कलम 66 (ड),66 (क) सह भारतीय न्याय संहिता कलम 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक व्हनमाने हे करीत आहे.