Thane Crime News : अकस्मित मृत्यूचा वडिलांना संशय, पोलिसांकडून फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणी घातपात झाल्याचा पोलिसांना ही संशय
•Thane Crime News खुनाचा गुन्हा दाखल, वडिलांना मुलीच्या मृत्यू बाबत संशय, जे.जे रुग्णालयात शवविच्छेदन
ठाणे :- गोकुळ भास्कर तायडे (55 वर्ष) राहणार जळगाव, त्यांची मुलगी प्रियंका गोकुळ तायडे (26 वर्ष) ती ठाण्याच्या शिवाजीनगर वागळे इस्टेट ठाणे पश्चिम येथे राहत होती. तिचा मृत्यू झाला होता तिच्या मृत्यूबाबत गोकुळ यांनी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तिच्या मृत्यूची अकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती. परंतु मुलीच्या मृत्यूबाबत संशय आल्याने त्यांनी श्रीनगर पोलीस ठाण्यात संशयास्पद मृत्यूची तक्रार दाखल केली होती.
संशय मृतदेहाचा जे.जे रुग्णालयात इन कॅमेरा शव विच्छेदन, मृतदेहावर जखमी खुणा
गोकुळ यांनी मुलीच्या मृत्यू बाबत संशय व्यक्त केल्याने श्रीनगर पोलिसांनी प्रियंका तिचे मृतदेह जे जे रुग्णालयात इन कॅमेरा शव विच्छेदन केले होते. मृत्यूचे कारण अनैसर्गिक मृत्यू झाल्याचे पोलिसांना निष्पन्न झाले आहे. फिर्यादी यांची मुलगी प्रियांका तायडे हिला कोणीतरी अज्ञात कारणावरून छातीवर व गळ्यावर कोणत्यातरी धारदार शस्त्राने वार करून तिला जीवे ठार मारल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. प्रियंका यांच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103 (1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बोडके हे करत आहे. पोलिसांकडून घडलेल्या घटनेबाबत तपास चालू असून अज्ञात आरोपींचा शोध घेतला जात आहे.