ठाणे

Thane Crime News : एक्सपायरी मालाचं एक्स्पोज! फ्लिपकार्टचा जुना माल बाजारात विक्रीला; ठाण्यात 200 टन मालासह मोठा घोटाळा उघड

•ठाणे गुन्हे शाखेची छापेमारी; दोन गोदामांतून 30 लाखांचा सुट्टा माल जप्त, कालबाह्य अन्नधान्य, सौंदर्यप्रसाधने, सॅनेटरी प्रॉडक्ट्स बाजारात खुलेआम विक्रीस

ठाणे – फ्लिपकार्ट कंपनीने नष्ट करण्यासाठी पाठवलेला एक्सपायरी माल बाजारात खुल्या विक्रीस आणणाऱ्या इको स्टार रिसायकलिंग कंपनीच्या धक्कादायक कारभाराचा भंडाफोड झाला आहे. ठाणे गुन्हे शाखा घटक-1 च्या पथकाने दोन गोदामांवर छापा टाकून तब्बल 200 टन कालबाह्य माल पकडला असून, यातून अंदाजे 30 लाखांचा सुट्टा माल विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे उघड झाले आहे.

गोपनीय माहितीवरून सुरू झाला कारवाईचा थरार

9 जुलै 2025 रोजी गुन्हे शाखेला मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. फ्लिपकार्ट कंपनीने नष्ट करण्यासाठी दहिसर नाका, शिळ-डायघर, ठाणे येथील इको स्टार रिसायकलिंग अँड ई-वेस्ट रिसायकलिंग कंपनीला दिलेला माल, नाश न करता बाजारात खुल्या विक्रीसाठी सुट्टा करून ठेवण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई आखण्यात आली.

या प्रकरणी पोलीस उपायुक्त (गुन्हे) डॉ.अनिल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली,वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड,
पोलीस निरीक्षक गणेश पाटील,
पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश शेळके,
अन्न सुरक्षा अधिकारी सुरेश पाटील,
व इतर अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे गोडाऊनवर कारवाई केली.

53,000 व 31,000 चौ.फुटाचे गोदाम; हजारो किलो माल सुट्टा करून विक्रीस

या पथकाने 9 जुलै रोजी रात्री 11.35 पासून 10 जुलैच्या दुपारी 12.00 पर्यंत आरिफ कंपाऊंड, दहिसर नाका व गरीब नवाज इस्टेट, पनवेल रोड, ठाणे येथील दोन गोडावूनवर सलग छापेमारी केली. तपासणीत खालील गोष्टी उघड झाल्या

1.फ्लिपकार्टकडून आलेले एक्सपायरी माल: आटा, डाळी, तांदूळ, ड्रायफ्रूट्स, चॉकलेट्स, साबण, सॅनेटरी पॅड, टॉयलेट क्लिनर, वॉशिंग पावडर, सौंदर्यप्रसाधने, इ.

2.या मालावरून मूळ कंपनीचे ब्रँडिंग फाडून 12 टन (1200 किलो) माल साध्या पारदर्शक प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरून ठेवण्यात आलेला होता.

3.या मालाची अंदाजे किंमत रु. 30 लाख असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

4.बनावट डिलिव्हरी चळती तयार करून हा माल भिवंडी व इतर ठिकाणी विक्रीस पाठवला जात होता.

मुख्य आरोपी ताब्यात; पोलीस कोठडीत चौकशी सुरू

या धाडीत खालील दोघांना अटक करण्यात आली:

1.मोहंमद इरफान मोहमंद मुनीर चौधरी (वय 41,रा.महेंद्र सिंग चाळ, साकीनाका, मुंबई)

2.मोहम्मद अक्रम मोहम्मद इस्माईल शेख (वय 58,रा. गौरीपाडा, भिवंडी, जि. ठाणे)

या दोघांविरोधात शिल-डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 318(4), 336(2), 336(3), 340(2), व 3(5) नुसार कारवाई करण्यात आली आहे.
दोघांना 10 जुलै रोजी अटक करण्यात आली असून, 14 जुलै 2025 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या प्रकरणातील आणखी काही घटक, साथीदार, ट्रान्सपोर्ट नेटवर्क आणि विक्री साखळीचा तपास सुरू असून, ठाणे गुन्हे शाखा, घटक-1 यांचे अधिकारी या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

2 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

20 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

20 hours ago