Thane Crime News : अंमली पदार्थ विक्री करणारे रॅकेट पोलिसांनी केले गजाआड
•Thane Crime News खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे यांची कामगिरी : अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या तीन आरोपींना अटक, लाखोंचा चरस हा अंमली पदार्थ जप्त
ठाणे :- खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे एक व्यक्ती भिवंडी-मुंबई हायवेवर असलेल्या टेमघर पाईपलाईन रोड या ठिकाणी अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून एका आरोपीला अटक केली आहे. 14 जून 2024 रोजी सायंकाळी सहा वाजल्याच्या सुमारास पोलिसांनी आरोपी अनिलकुमार श्रीमुखलाल प्रजापती (42 वर्ष) याला पोलिसांनी अटक केली आहे. हा आरोपी मेकॅनिकल असून तो पाईपलाईन रोड भिवंडी येथे राहत होता तसेच तो आरोपी हा मूळचा उत्तर प्रदेश राज्याचा आहे. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक किलो 720 ग्रॅम वजनाचा चरस हा अंमली पदार्थ सापडला. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी अनिल कुमार यांची चौकशी केली असता तुला हा अंमली पदार्थ कोण पुरवतो असे पोलिसांनी विचारले असता, त्याने उत्तर प्रदेशच्या राहत असलेल्या अर्जुन कुमार जोखुलाल प्रजापती (38 वर्ष) हा पूर्वत असल्याचे सांगितले. पोलिसांनी ताबडतोब आपले पथक उत्तर प्रदेश येथे रवाना करून आरोपी अर्जुन कुमार याला 20 जून 2024 रोजी अटक केली आहे.
एका आरोपीला उत्तर प्रदेश मधून अटक तर दुसऱ्या आरोपीला नवी मुंबईतुन अटक तसेच, पोलिसांनी अर्जुन कुमार याची चौकशी केली असता त्याने नवी मुंबईतील एका रिक्षाचालकालाही चरस विक्री केल्याचे सांगितले अर्जुन कुमार यांच्या सांगण्यावरून पोलिसांनी सापळा रचून नवी मुंबई नेरूळ सेक्टर 3 मधील राहणाऱ्या श्याम बाबू प्रल्हाद सरोज (51 वर्ष) यालाही पोलिसांनी अटक केली आहे हे तिघेही आरोपी मूळचे उत्तर प्रदेश मधील प्रयागराज येथील आहे. पोलिसांनी श्याम बाबू यांच्या घराचे झडती घेतली असता त्याच्या घरामध्ये एक लाख किमतीचे 170 ग्राम वजनाचे चरस अंमली पदार्थ पोलिसांना आढळून आले आहे. खंडणी विरोधी पथकातील अधिकारी आणि कर्मचारी या पथकाने एकूण तीन आरोपींना अमली पदार्थाची विक्री आणि तस्करी केल्याप्रकरणी एन डी पी एस कायदा अंतर्गत तीन आरोपींना अटक करून त्यांच्या जवळील एकूण एक किलो 890 ग्रॅम वजनाचा चरस हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. ज्याची किंमत 18 लाख 90 हजार रुपये आहे. तीन आरोपीं पैकी मुख्य आरोपी अर्जुनकुमार जोखुलाल प्रजापती याच्या विरुध्द ठाणे शहर आणि उत्तर प्रदेश येथे गंभीर स्वरूपाचे गुन्हे 04 दाखल आहेत.
पोलीस पथक
आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे शहर,डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस सह आयुक्त, ठाणे शहर. डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, (गुन्हे), ठाणे शहर शिवराज पाटील, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे), ठाणे, राजकुमार डोंगरे, सहायक पोलीस आयुक्त, शोध -2. गुन्हे शाखा, ठाण, शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, विशेष कृती दल यांचे मार्गदर्शनाखाली मालोजी शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खंडणी विरोधी पथक, ठाणे, महिला पोलीस निरीक्षक वनिता पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक भुषण कापडनिस, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण गोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल तारमळे, पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार राठोड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुभाष तावडे, कल्याण ढोकणे, पोलीस हवालदार संजय राठोड, आशिष ठाकुर, सचिन शिंपी, गणेश गुरसाळी, संदीप भोसले, योगीराज कानडे, महिला पोलीस हवालदार शितल पावसकर,भगवान हिवरे, पोलीस शिपाई तानाजी पाटील, अरविंद शेजवळ, महिला पोलीस शिपाई मयुरी भोसले, पोलीस हवालदार निलेश जाधव, शार्दुल यानी केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल तारमळे खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहर हे करीत आहे.