Thane Crime News : विद्या प्रसारक मंडळ येथील संचालक (सहसचिव) यांना एसीबी कडून अटक
•शहापूर येथील किन्हवली येथील विद्या प्रसारक मंडळ येथील संचालक (सहसचिव) चंद्रकांत हरिभाऊ धानके यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहात पकडले
ठाणे :- लाचलुचपत प्रतिबंध विभाग, ठाणे यांनी मोठी कारवाई करत शहापूर येथील किन्हवली गावातील विद्या प्रसारक मंडळ येथील संचालक (सहसचिव) चंद्रकांत हरिभाऊ धानके यांना लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. दोन वर्षाचे वेतनवाढ पूर्ववत करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे एक लाख दहा हजार रुपयांची लाच मागितली होती.किन्हवली पोलीस ठाण्यात भालके यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तकारदार यांनी 9 ऑक्टोबर एसीबी कार्यालय ठाणे येथे दिलेल्या तक्रारी तक्रारदार यांचेकडून त्यांचे रोखण्यात आलेले दोन वर्षाचे वेतन वाढ पूर्ववत करण्यासाठी 1.10 लाख लाचेच्या रकमेची मागणी केल्याची तक्रार प्राप्त झाली होती
तक्रारीच्या अनुषंगाने 14 ऑक्टोबर रोजी करण्यात आलेल्या पडताळणी दरम्यान
चंद्रकांत हरिभाऊ धानके, संचालक (सहसचिव), यानी तक्रारदार यांचेकडून त्यांचे रोखण्यात आलेले दोन वर्षांचे वेतन वाढ पूर्ववत करण्यासाठी 1.10 लाख लाचेच्या रक्कमेची मागणी करून तात्काळ घेवून देण्याचे सांगितल्याचे निष्पन्न झाल्यानंतर लगेच सापळा रचून चंद्रकांत हरिभाऊ धानके, संचालक (सहसचिव), विद्या प्रसारक मंडळ, (किन्हवली ता. शहापूर, जि. ठाणे) यांनी तक्रारदार यांचेकडून शहा बंदुलाल सरुपचंद विद्यालय किन्हवली शाळेसमोरील बसस्टॉप समोर तक्रारदार यांचे गाडीत 1.10 लाखांची लाचेची रक्कम स्वीकारली असता, एसीबीने रंगेहाथ पकडून ताब्यात घेण्यात आले असून लाचेची रक्कम धानके यांचेकडून हस्तगत करण्यात आली आहे.
संदीप दिवाण, अपर पोलीस आयुक्त, ॲन्टी करप्शन ब्युरो, मुंबई तथा अतिरिक्त पदभार ॲन्टी करप्शन ब्युरो ठाणे, गजानन राठोड, अपर पोलीस अधीक्षक, ॲन्टी करप्शन ब्युरो ठाणे, महेश तरडे, अपर पोलीस अधीक्षक, ॲन्टी करप्शन ब्यूरो, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मराज सोनके पोलीस उप अधीक्षक ॲन्टी करप्शन ब्यूरो, ठाणे यांनी कारवाई केली आहे.