Thane Crime News : बेकायदेशीर हत्यार ; देशी कट्टा, एक बुलेट पोलिसांनी केले जप्त
Thane Crime News Chitalsir Police Thane Caught Deshi Katta : चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून, आरोपीकडून देशी कट्टा (बंदूक) केटीएम बाईक जप्त
ठाणे :- लोकसभेच्या निवडणुका Lok Sabha Election जाहीर झाल्या असून राज्यात कोणत्याही प्रकारे बेकायदेशीर रित्या हत्यारे बाळगणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा बडगा उभारला आहे. ठाण्याच्या नळपाडा तबेल्याजवळ कापूरबावडी येथे एका युवकाला बेकायदेशीर रित्या शस्त्र बंदूक बाळगण्या प्रकरणी अटक केली आहे.
चितळसर पोलीस ठाणेचे पोलीसांना मिळालेल्या माहिती वरून, सहाय्यक पोलीस निरीक्षक वेंगुर्लेकर, पोलीस हवालदार कलगुटकर व त्यांचे पथकाने, (08 एप्रिल) रोजी रात्रौ 01.30 वा.चे सुमारास, नळपाडा तबेल्याजवळ, कापुरबावडी, ठाणे पश्चिम येथे आरोपी अजय दिलीप निर्मल, (21 वर्षे), (रा.अमराईनगर, कापुरबावडी, ठाणे पश्चिम) यास ताब्यात घेवुन त्याची अंगझडती घेतली असता, त्याचे ताब्यात 1 देशी बनावटीचा लोखंडी कट्टा (अग्नीशस्त्र), 1 बुलेट व केटीएम कंपनीची बाईक असा मुद्देमाल मिळुन आला. सदर प्रकाराबाबत सरकार तर्फे दिलेल्या फिर्यादी वरून आरोपीविरूध्द गुन्हा भारतीय हत्यार कायदा कलम 3,25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1),135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, आरोपीस अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वेंगुर्लेकर हे करीत आहेत.