Thane Crime News : फसवणूक ; शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केल्यास लाखोचा आमिष
•Thane Share market Crime News शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केल्यास लाखोच्या अमिष दाखवून फसवणूक झाल्याची घटना
ठाणे :- आधुनिक युगात डिजिटल चोर सध्या मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. Thane Crime News शेअर मार्केट, गुगल रेटिंग, अशा विविध स्कीम सांगत लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळक्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ऑनलाइन युगात चोरट्यांनी ऑनलाइन चोरीचे प्रशिक्षण घेऊन लोकांच्या बँकेच्या खात्यावर डल्ला मारला जात आहे. यामध्ये जास्त करून तरुण पिढीला आणि वयोवृद्ध वर्गाला यांच्याकडून टार्गेट केले जात आहे.
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक चा नफा मिळेल असे अमिष अकाउंट फसवणूक करण्याची घटना ठाण्याच्या समोर आली आहे. यामध्ये अमित विजय पेठे (42 वर्ष) यांना CINV नावाचे ॲप डाऊनलोड करण्यास सांगून त्या ॲप मध्ये शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास अधिक परतावा मिळवण्याचे अमिष दाखविले आहे. त्यामध्ये आम्ही त्यांनी जवळपास 27 लाख 91 हजार पाचशे रुपये गुंतवणूक केले होते. या पैशाचा कोणताही प्रकारे आर्थिक परतावांना मिळाल्याने आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी ठाणे नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अमित यांनी फिर्यादीवरून आरोपी विरोधात भादवि कलम 419,420,465,467,468,471,34 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई पो नि प्रताप भोसले हे करत आहे Thane Crime News