क्राईम न्यूज

Thane Crime News : ठाण्यात 1 कोटी 10 लाखांचा ‘चरस’ जप्त! – जम्मू-काश्मीर कनेक्शन असलेल्या मोहम्मद सिद्धिकीला मुंब्रा पोलिसांकडून अटक

Thane Latest Crime News : नववर्षाच्या पार्ट्यांसाठी आणलेला चरस ऐरोली-मुंब्रा बोगद्याजवळ जप्त; आरोपी मोहम्मद सिद्धिकीविरोधात राजस्थानमध्येही गुन्हा नोंद

ठाणे :- नववर्षाच्या स्वागतानिमित्त होणाऱ्या पार्ट्यांमध्ये अमली पदार्थांचा वापर रोखण्यासाठी ठाणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मुंब्रा पोलिसांनी Mumbra Police मोहम्मद हारून हरसत अली सिद्धिकी (वय 42) याला अटक करून त्याच्या ताब्यातून तब्बल 1 कोटी 10 लाख 25 हजार रुपये किमतीचा चरस जप्त केला आहे. Thane Police Latest News

मुंब्रा पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी शनिवारी (7 डिसेंबर) रात्री ऐरोली-मुंब्रा बोगदा भागात गस्त घालत असताना त्यांना एक व्यक्ती संशयास्पदरीत्या आढळून आला. पोलिसांना पाहताच तो पळू लागल्याने पथकाने त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.
त्याची झडती घेतल्यानंतर पोलिसांना त्याच्याकडून 2 किलो 205 ग्रॅम वजनाचा चरस हा अमली पदार्थ आढळून आला. आरोपी मोहम्मद सिद्धिकी हा मुंब्रा येथे वास्तव्यास असून, त्याने हा चरसचा मोठा साठा थेट जम्मू-काश्मीरमधून आणल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. त्याच्याविरोधात राजस्थान येथील पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हा जप्त केलेला चरसचा साठा तो ठाण्यातील कोणत्या पार्टी आयोजकांना किंवा तस्करांना विकणार होता, याबद्दल सखोल तपास सुरू असून, पोलिसांनी त्याच्या जम्मू-काश्मीरमधील ‘कनेक्शन’चा शोध सुरू केला आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

2 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

20 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

20 hours ago