•Thane Crime News सोन्या-चांदीचे दागिने,मोबाईल फोन , रोख रक्कम या मौल्यवान वस्तूवर चोरट्याचा डल्ला
ठाणे :- घराच्या बाहेर पडताना घराचे कुलूप नीट लागले की नाही याची काळजी घ्या कारण चोरीच्या घटना सातत्याने वाढत आहे. चोरटे चोरीच्या घटनेमध्ये जास्त करून सोन्याच्या वस्तूवर डल्ला मारत असतात. घरात कोण नाही या संधीचा फायदा घेत चोरटे घरामध्ये शिरून घरातील मौल्यवान वस्तू लंपास करतात अशीच एक घटना कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुंभारआळी येथे राहणाऱ्या सुहास मुरलीधर सूर्यवंशी यांच्यासोबत घडली आहे. घरात कोण नसल्याचा फायदा घेत चोरट्याने लाखो रुपयांच्या दागिन्यावर डल्ला मारून लंपास केले आहे.
कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल, पोलिसांकडून चोरट्यांचा शोध
09 जुलै दरम्यान सुहास सूर्यवंशी हे कामानिमित्त बाहेर गेले असता त्यांच्या घरात कोण नव्हते या संधीचा फायदा घेत त्यांच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत मध्ये प्रवेश केला. आणि घरातील सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल फोन, रोख रक्कम असं मौल्यवान ऐवज घेऊन चोरटे फरार झाले आहे. जवळपास चोरट्यांनी 4 लाख 81 हजार रुपयाचे ऐवज चोरी केला आहे. सुहास सूर्यवंशी आणि साक्षीदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कळवा पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 305 (अ),331 (3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव हे करत आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…