Thane Crime News : घरफोडी व चोरी करणारे जेरबंद; ‘इतक्या’ लाखांचा चोरी केलेला मुद्देमाल जप्त
•घरफोडी व चोरी करणाऱ्या सराईत आरोपींना अटक करण्यात कळवा गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश मिळाले असून दोन हि आरोपींकडून पोलिसांनी 1 लाख 74 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
ठाणे :- राज्यात विधानसभा निवडणुकीचा माहोल असून त्याच बरोबर दिवाळीचा सणही मोठ्या उत्साहाने राज्यभरात आणि देशभरात साजरा केला जातो. अशातच चोरांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.शहर व परिसरात घरफोडी व चोरी करणाऱ्या सराईत आरोपींना अटक करण्यात कळवा गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश मिळाले असून दोन्ही आरोपींकडून पोलिसांनी 1 लाख 74 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जानवी उतेकर (35 वय,रा.म्हाळसाई चाळ कळवा पु.) यांच्या घरात 26 ऑक्टोबर रोजी दुपारच्या दरम्यान चोरी झाल्या बाबतची तक्रार कळवा पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात भादवि कलम 331(3),305,3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घरफोडीमध्ये आरोपींनी महिलेच्या घरातील सोन्याचे दागिने आणि एलईडी टीव्ही जवळपास एक लाख पन्नास हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरी केला असल्याची तक्रार दिली होती.
वरिष्ठांच्या आदेशान्वये तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पिंपळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धोंडे, गुन्हा प्रकटीकरण पथकाने तपास सुरू केला. सीसीटीव्ही कॅमेरे तसेच तांत्रिक तपास यांचे मदतीने गुन्हयातील आरोपी याने गुन्हे केले नंतर वापरलेला मार्ग व गुन्हे करणे पूर्वी वापरलेला मार्ग याचा अभ्यास करून आरोपीचे वास्तव्याचे ठिकाण निश्चित केले. वडाळा मुंबई परिसरात दुचाकी वर गस्त घालून व वेषांतर करून सापळा लावून आरोपीचा शोध घेतला. दोन आरोपी याच परिसरात मिळून आल्याने शिताफीने त्याला पकडून दोन्ही आरोपीला अटक केली.आरोपीकडून दोन गुन्ह्यातील चोरी गेलेले सोन्याचे दागिने असा एकूण 1 लाख 74 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. आरोपींना अटक केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धोंडे करत आहेत.
अटक आरोपी –
1.मोहम्मद आयुब अली राजू खान (वय 24 रा.गौसिया मस्जिद जवळ, हिंदुस्तान नगर झोपडपट्टी, संगम नगर पोलीस चौकीच्या मागे, वडाळा, मुंबई)
2) इसरार नियाज अहमद शेख (वय 28 रा. जामा मस्जिद जवळ, हिंदुस्तान नगर झोपडपट्टी, संगमनगर पोलीस चौकीच्या मागे, वडाळा मुंबई).