•ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केलेल्या कारवाईत लाच प्रकरणात तलाठ्यांच्या विरोधात ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
ठाणे :- तलाठीने सात बारा संदर्भाच्या प्रलंबित कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी 40 हजार रुपयांची लाच मागितल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी तलाठ्याच्या विरोधात ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कळवा शहरातील आहे. यातील तक्रारदार यांना गृहसंकुल उभे असलेल्या जागेवरील सात बारा गृहसंकुलाच्या नावे करायचा होता. परंतु हा सात बारा गृहसंकुलाच्या नावावर करण्यासाठी संशयित तलाठी सिद्धी पातकर यांनी त्यांच्याकडून 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. यानंतर तक्रारदार यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. पथकांनी पडताळणी केली असता, तलाठी पातकर यांनी 40 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याविरोधात सोमवारी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप अधीक्षक,माधवी राजेकुभांर, (ए.सी.बी., ठाणे) हे करीत आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…