Thane Crime News : गुन्हे शाखा, घटक-1, ठाणे यांची मोठी कारवाई ;15 ग्रॅम पासुन सुरू झालेल्या तपासात कोटयावधी रूपयांचे अंमली पदार्थ जप्त’
Thane Crime News मेफेड्रोन (MD) अंमली पदार्थाची उत्तरप्रदेशातील अजून एक फॅक्टरी उध्वस्त गुन्हे शाखा, घटक-1 यांची कामगिरी
ठाणे :- ललित पाटील प्रकरणानंतर महाराष्ट्रात अंमली पदार्थ खास करून एम.डी पदार्थाचे विक्री करणाऱ्या विरोधात पोलिसांनी कारवाईचा चांगलाच बडगा उगारला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात हजारो कोटीहून अधिक किमतीचे एमडी अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केला असून अनेक कारखाने उध्वस्त केल्याच्या बातम्या सातत्याने समोर येत आहे. ठाणे पोलिसांनी Thane Crime News उत्कृष्ट कामगिरी करत अमली पदार्थ तयार करणारा उत्तर प्रदेश मधील कारखाना उद्ध्वस्त केलाची बातमी समोर आली आहे. 15 ग्रॅम अंमली पदार्थाच्या शोधापासून ते कोट्यावधीचा कारखाना उध्वस्त करण्यात ठाणे पोलिसांना यश आले आहे.
पोलिसांची कारवाई
गुन्हे शाखा, घटक-1, ठाणे Thane Crime News येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक रूपाली पोळ, यांच्याकडे तपासावर असलेला कासारवडवली पोलीस स्टेशन, ठाणे शहर एन.डी.पी.एस. ॲक्ट 1985 चे कलम 8 (क), 22 (ब), 22 (क), 29 प्रमाणे दि. 24 जानेवारी 2024 रोजी दाखल असून नमुद गुन्हयाच्या तपासात यापुर्वी 7 आरोपी अटक केले असून त्यांच्याकडे केलेल्या तपासात निष्पन्न झालेले पाहीजे.
उत्तर प्रदेश मधील कारखाना उध्वस्त
आरोपी विजय पाल व बिंदु यांचा शोध घेत असता नमुद आरोपी यांनी आजमगढ, उत्तरप्रदेश येथे MD हा अंमली पदार्थ बनविण्याचा कारखाना सुरू केल्याची माहीती मिळाल्याने गुन्हे शाखा, घटक-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक रूपाली पोळ व गुन्हे विभाग ठाणे शहरच्या अख्त्यारीतील इतर अधिकारी व अंमलदार यांनी पोलीस उप गुन्हे ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली जौनपुर व आजमगढ़, उत्तरप्रदेश येथे जावून बनारस, उत्तरप्रदेश एस.टी.एफ चे अपर पोलीस अधिक्षक विनोदसिंग, पोलीस निरीक्षक अनिलकुमार सिंग, पोलीस निरीक्षक अरविंद यादव, पोलीस निरीक्षक अमित श्रीवास्तव व त्यांचे सहकारी अधिकारी/अंमलदार यांच्या मदतीने 24 एप्रिल 2024 रोजी छापा कारवाई करून 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
आरोपी नावे
1) संदीप इंद्रजीत तिवारी, रा.वाराणसी,
2) ललित उर्फ सोनू राकेश चंद्र पाठक, रा.वाराणसी,
3) अनिल शिवआसरे जयस्वाल, रा.नालासोपारा, जि. पालघर,
4) निलेश श्रीधर पांडे, रा.चलवापी, गुजरात, मुळ रा उत्तरप्रदेश,
5) विजय रामप्रसाद पाल, रा.वाराणसी, उत्तरप्रदेश,
6) बिंदु उर्फ जिलाजीत जोखई पटेल, रा.वाराणसी, उत्तरप्रदेश
यांना अटक करून आजमगड उत्तरप्रदेश येथील कारखान्यातून 25 ग्रॅम MD क्रिस्टल पावडर, तसेच केमीकल मिक्स करून 20 किलो पर्यंत MD हा अंमली पदार्थ तयार होत असलेले मिश्रण, आरोपी वापरत असलेली क्रेटा कार, इतर साहीत्य असे रु. 20 कोटी 18 लाख 49 हजार 716 किंमतीचे MD हा अंमली पदार्थ व MD पावडर बनविण्यासाठी लागणारे कच्चे मटेरीयल, केमीकल, संपर्कासाठी वापरत असलेले मोबाईल फोन तसेच वाहने असे आजमगढ, उत्तरप्रदेश येथे जप्त करण्यात आले आहेत.
आरोपी यांच्या कडे केलेल्या तपासात आरोपी नामे दिलीप शिवआसरे जयस्वाल याचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांस देखील नमुद गुन्हयात अटक केली आहे.अटक आरोपी पैकी अटक आरोपी नामे संदीप इंद्रजीत तिवारी, रा-वाराणसी उर्फ डॉक्टर हा इतर अटक आरोपी यांना तसेच यापुर्वी अटक केलेल्या आरोपी यांना MD पावडर बनविण्यासाठी केमीकलचे मिश्रणाचा फॉर्मुला तयार करून देत असल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे.
आरोपींना सहा मे पर्यंत पोलीस कोठडी
गुन्हयात नमुद सर्व आरोपी यांना न्यायालयाने दि.06 मे 2024 रोजी पावेतो पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली आहे.
गुन्हयात यापूर्वी 7 आरोपी यांना अटक केली असून नमुद गुन्हयात एकणू 14 आरोपी यांना आतापावेतो अटक केली असून त्यांच्याकडून कडून आता पावेतो एकूण रु.48 कोटी 14 लाख 17 हजार 798 एवढ्या रकमेचा MD पावडर हा अंमली पदार्थ व MD पावडर हा अंमली पदार्थ तयार करण्यासाठी लागणारे मटेरीयल तसेच मशिनरी जप्त करण्यात आली आहे. पुढील अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रूपाली पोळ करीत आहेत.
पोलीस पथक
आशुतोष डुंबरे पोलीस आयुक्त Ashutosh Dumbare, ठाणे शहर, ज्ञानेश्वर चव्हाण पोलीस सह आयुक्त, ठाणे शहर, डॉ. पंजाबराव उगले , अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, शिवराज पाटील, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, ठाणे निलेश सोनवणे, सहाय्यक पोलीस आयुक्त, शोध-1, गुन्हे शाखा, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक रूपाली पोळ, पोलीस उपनिरीक्षक भिलारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महापुरे, पोलीस हवालदार मोटे, निकुंभ, फरास, नेम. गुन्हे शाखा, घटक-1, ठाणे, पोलीस शिपाई विजय यादव गुन्हे, शाखेचे पोलीस उपनिरीक्षक कोल्हापुरे, पोलीस शिपाई भोसले, पोलीस शिपाई महेश कांबळे यांनी केली आहे.