Thane Crime News : ब्युटी पार्लरमधून बॅग चोरीला..!!

Thane Crime News : ठाण्यामध्ये चोरी, महिलेचे ब्युटी पार्लर मधून बॅग चोरीला, बॅगेमध्ये मंगळसूत्र आणि रोख रक्कम
ठाणे :- ब्युटी पार्लर Beauty Parlour मधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेची ब्युटी पार्लर मध्ये ठेवलेली बॅग चोरीला Bag Stolen गेली त्या बॅगेमध्ये मंगळसूत्र आणि रोख रक्कम असं जवळपास दोन लाखाहून अधिक किंमतीचा ऐवज महिलेचा लंपास केला आहे. ही घटना ठाण्याच्या जस सलॉन मधील घटना आहे. हे पार्लर वसंतविहार ठाणे पश्चिम येथे आहे. Thane Bag Stolen From Beauty Parlour
पार्लरच्या सोप्यावरून महिलेची पर्स चोरीला
शनिवारी (06 जुलै), सायंकाळी 5.45 सुमारास फिर्यादी महिला (35 वर्ष) या वसंत विहार येथे असलेल्या जस सलॉन या ब्युटी पार्लर मध्ये गेल्या होत्या. सोन्याचे मंगळसूत्र रोख रक्कम आणि इतर सामान असलेली पर्स ती पार्लरच्या सोप्यावर ठेवली होती. त्या पर्सचा रंग ब्राऊन असून त्यामध्ये दोन लाख चाळीस हजार पाचशे रुपये किंमतीचे मंगळसूत्र, रोख रक्कम इतर वस्तू असा मुद्देमाल होता. ट्रीटमेंट घेत असताना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांची पर्स चोरल्याची तक्रार त्यांनी चितळसर पोलीस ठाण्यात दिले आहे. महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 305(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुण्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हिंगे हे करत आहे. Thane Bag Stolen From Beauty Parlour