क्राईम न्यूज

Thane Crime News : जुन्या वादातून टेंभी नाक्यावर हल्ला – तरुण गंभीर जखमी

Thane Nagar Police Latest Crime News : आफरीन खान व अज्ञात इसमाकडून धारदार शस्त्राने हल्ला; ठाणेनगर पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू

ठाणे – टेंभी नाका Tembhi Naka परिसरात रविवारी रात्री उशिरा एका जुन्या वादातून घडलेल्या हल्ल्याने खळबळ उडाली आहे. सुव्रत अपार्टमेंटसमोरील नवरात्र कार्यालयासमोर बसलेल्या सुधीर कोकाटे आणि त्यांच्या मित्रांवर चॉपरसारख्या धारदार शस्त्राने अचानक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गजानन म्हात्रे (वय 35) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. Thane Latest Crime News

प्राप्त माहितीनुसार, सुधीर कोकाटे हे त्यांचे मित्र गजानन म्हात्रे यांच्यासह टेंभी नाका परिसरात कामानिमित्त थांबले असताना आफरीन खान नावाच्या महिलेसोबत आलेल्या अज्ञात इसमाने जुन्या वादातून कोकाटे व त्यांच्या मित्रांवर हल्ला चढवला. गजानन म्हात्रे यांच्या पाठीवर व डाव्या हातावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याने ते रक्तबंबाळ झाले.

या प्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात Thane Nagar Police Station भारतीय दंड विधान कलम ११८(२), 351(3), 49(3)(5) व भारतीय शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 4,25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेतली असून आरोपींचा शोध सुरू आहे.पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून, लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, अशी माहिती ठाणेनगर पोलिसांनी दिली आहे. हल्ल्याचे नेमके कारण आणि पार्श्वभूमी तपासाअंती स्पष्ट होणार आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

2 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

19 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

19 hours ago