Thane Crime News ठाणे पोलिसांची धडाकेबाज कारवाई, बंदुकीचा साठा करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केले अटक
ठाणे :- लोकसभा निवडणुक प्रकीया 2024 कायदा व सुव्यवस्थेस बाधा न येता शांततेत पार पडावी याकरीता पोलीस आयुक्त , ठाणे शहर यांनी गुन्हे शाखेच्या पथकांना जास्तीत जास्त अवैध शस्त्र, अंमली पदार्थ विरोधी कारवाया करण्याचे सक्त आदेश दिले आहेत. आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने 18 एप्रिल 2024 रोजी खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहर प्रयत्नशील असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल तारमळे व पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार राठोड यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, शंभु महतो नावाचा इसम त्याचेकडे मोठया प्रमाणावर अवैध अग्नीशस्त्र, काडतुसे, गावठी कट्टे घेवुन विक्रीकरीता साकेत रोड, राबोडी, ठाणे येथे येणार आहे. Thane Crime News
बातमीच्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे, विशेष कृती दल, गुन्हे शाखा, ठाणे शहर व महीला पोलीस निरीक्षक वनिता पाटील यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाने साकेत रोड, राबोडी, ठाणे पश्चिम येथे सापळा रचला असता शंभु सुरेश महतो, (35 वर्षे) धंदा बेकार, रा. टागोर नगर विक्रोळी पुर्व, मुबई मुळ गाव- बिहार हा अवैध रित्या अग्निशस्त्रासह मा. पोलीस आयुक्त सो ठाणे शहर यांनी जारी केलेल्या मनाई आदेशाचा भंग करीत असताना मिळुन आला त्याचेविरूध्द राबोडी पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम कलम 3,25(1ब) (अ) सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीची दिनांक 25 एप्रिल रोजीपावेतो पोलीस कोठडी रिमांड मंजूर आहे. Thane Crime News
गुन्हयाचे तपासादरम्यान नमुद आरोपीकडून खंडणी विरोधी पथकाने आरोपीकडुन एकूण 4 पिस्टल, 2 गावठी कटटे, 1 मॅगझीन व 18 जिवंत काडतुसे असे एकूण 3 लाख 40 हजार रूपये किमतीचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. नमुद आरोपी इसमाने वरील बंदूक (अग्नीशस्त्र) साठा नेमका कोणत्या कारणासाठी आणला होता याबाबत पुढील तपास खंडणी विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सुनिल तारमळे करीत आहेत. पोलीसांनी केलेल्या तपासात नमुद आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरूध्द रबाळे पोलीस स्टेशन, नवी मुंबई येथे खूनाचा गुन्हा दाखल असुन तो जामीनावर बाहेर असल्याचे आढळून आले आहे. Thane Crime News
पोलीस पथक
पोलीस आयुक्त, ठाणे शहर आशुतोष डुंबरे CP Ashutosh Dumbare, पोलीस सह आयुक्त, ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजकुमार डोंगरे, शोध 2, गुन्हे शाखा, ठाणे शहर, सहायक पोलीस आयुक्त शेखर बागडे, विशेष कार्य दल, गुन्हे शाखा, ठाणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकातील महिला पोलीस निरीक्षक वनिता पाटील, श्रीकृष्ण गोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भुषण कापडणीस, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल तारमळे, पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार राठोड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुभाष तावडे, कल्याण ढोकणे, संजय बाबर, पोलीस हवालदार सचिन शिंपी, योगीराज कानडे, संजय राठोड,गणेश गुरसाळी, महिला पोलीस हवालदार शितल पावसकर, महिला पोलीस शिपाई मयुरी भोसले, पोलीस शिपाई तानाजी पाटील, पोलीस शिपाई अरविंद शेजवळ, विनोद ढाकणे भगवान हिवरे यांनी केली आहे. Thane Crime News
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…