Thane Crime News : खंडणी विरोधी पथकाची कारवाई ; बांधकाम व्यवसायिकाला महानगरपालिकेचे कारवाईचे धमकी देत 50 हजाराची मागितली होती खंडणी
•काम करायचे असेल तर 50 हजार रुपये दे… नाहीतर महानगरपालिकेला तक्रार करतो… अशी बांधकाम व्यवसायिकाला धमकी
ठाणे :- गणपत म्हात्रे यांचे मुंब्रा देवी परिसरात चालू असलेले इमारतीचे बांधकामाविरोधात ठाणे महानगरपालिकेत तक्रार देतो अन्यथा पैसे दे असे धमकी गोवर्धन पाटील व त्याचे सहकारी संधी व जितू वाघमारे यांनी बांधकाम व्यवसाय केला दिली होती. जर तुला हे काम करायचे असेल तर तुला पन्नास हजार रुपये द्यावे लागेल अन्यथा तुझी महानगरपालिकेला तक्रार करू अशी धमकी गोवर्धन पाटील यांनी दिली होती. या धमकीला घाबरून गणपत म्हात्रे यांनी गोवर्धन पाटील व त्याचे सहकारी यांना वीस हजार रुपये दिले होते परंतु वारंवार गोवर्धन पाटील हा उर्वरित 30 हजारकरिता गणपत म्हात्रे यांना धमकी देत होता.
खंडणी विरोधी पथकाची कारवाई आरोपींना अटक
गणपत म्हात्रे यांनी या संदर्भात पोलीस उप आयुक्त गुन्हे, ठाणे त्यांना 28 जून रोजी तक्रारी अर्ज दिला होता. त्यानंतर खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी खंडणी मागणाऱ्या व्यक्तींना खंडणीची रक्कम स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे. दिवा प्रभाग समिती कार्यालया जवळ खर्डी गाव ठाणे येथे तक्रारदार गणपत याच्याकडून आरोपी गोवर्धन हनुमान पाटील (41 वर्ष), गणेश सुधाकर शिंपी उर्फ सन्नी (40 वर्ष) तीस हजार रुपये स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे. गणपत म्हात्रे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिळडायघर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 308 (2),380 (3),380 (4),308 (5) प्रमाणे 3 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींना न्यायालय सोबत हजर केले असता त्यांना 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलीस पथक
पोलीस आयुक्त, ठाणे शहर आशुतोष डुंबरे, पोलीस सह आयुक्त, ज्ञानेश्वर चव्हाण,अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पंजाबराव उगले,पोलीस उप आयुक्त, गुन्हे, शिवराज पाटील, सहायक पोलीस आयुक्त, शोध -2, गुन्हे शाखा, राजकुमार डोंगरे, सहायक पोलीस आयुक्त, विशेष कार्य दल, गुन्हे शाखा, शेखर बागडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकातील महिला पोलीस निरीक्षक वनिता पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण गोरे, भुषण कापडणीस, सुनिल तारमळे, पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार राठोड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुभाष तावडे, कल्याण डोकणे, संजय बावर, पोलीस हवालदार सचिन शिंपी, योगीराज कानडे, संदिप भोसले, संजय राठोड, महिला पोलीस हवालदार शितल पावसकर, महिला पोलीस शिपाई मयुरी भोसले, पोलीस शिपाई तानाजी पाटील,अरविंद शेजवळ, भगवान हिवरे यांनी केली आहे.