Thane Crime News : सोनसाखळी चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक, 2 गुन्हयांची उकल
•घरफोडी, सोनसाखळी चोरीतील आरोपीला पोलीस कोठडी, 3.19 लाख किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त
ठाणे :- सोनसाखळी चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक करण्यात मुंब्रा पोलिसांना यश मिळाले आहे. आरोपीकडून 2 गुन्ह्यांची उकल करून 3.19 लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपीवर घरफोडी, सोनसाखळी यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहे.
मुंब्रा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बी एन एस कायदा कलम 305 अ,331 3,331 4 प्रमाणे गुन्हा दाखल असलेल्या आरोपी सुजितकुमार श्याम चंद्र प्रजापती (22 वय रा. आई एकविरा अपार्टमेंट साबेगाव दिवा, ठाणे) याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याकडून पोलिसांनी तीन लाख 19 हजार किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात घरफोडी, सोनसाखळी सारखे गंभीर गुन्हे दाखल आहे. पोलिसांनी आरोपीकडून तीन लाख 19 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ज्यामध्ये तीन ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 35 ग्रॅम सोन्याचे दागिने असे आरोपेकडून पोलिसांनी जप्त केले आहे. आरोपीला न्यायालयाकडून पोलीस कोठडी सुनावली आली आहे.