Thane Tadipar News : आरोपीला 18 महिन्यासाठी ठाणे जिल्ह्यातून केले होते हद्दपार
डोंबिवली :- राज्यात लोकसभेच्या निवडणुका Lok Sabha Election जाहीर झाले आहे. पोलिसांनी यंदाचे निवडणूक शांततेत आणि कायदा सुव्यवस्थेच्या अबाधित राहावे याकरिता शहरातील तसेच पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील तडीपार Thane Tadipar आरोपींना अटक करण्याचे निर्देश ठाणे शहराचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे Thane CP Ashutosh Dumbare यांनी दिले आहे. विनापरवाना शहरांमध्ये प्रवेश करत असाल तर त्यांना त्वरित अटक करण्याच्या सूचना दिल्या आहे. डोंबिवली पोलिसांनी मनाई आदेश भंग करणाऱ्या एका आरोपीला दत्तनगर डोंबिवली पूर्व अटक केली आहे. Thane Tadipar News
आरोपी सागर काशिनाथ दाते, (29 वर्षे) यास पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-3, कल्याण यांनी ठाणे, जिल्ह्याच्या हद्दीतुन 18 महिन्याच्या कालावधीकरिता हद्दपार करण्याचे आदेश, 06 जुन 2023 अन्वये दिले होते. परंतू आरोपी याने त्यास सदर महसुली जिल्हयामध्ये पोलीस आयुक्त, ठाणे शहर व पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-3 कल्याण यांचे परवानगीशिवाय प्रवेश करण्यास मनाई असताना सदर मनाई आदेशाचा भंग करून, 12 एप्रिल रोजी रात्री 9.00 वा. चे सुमारास, दत्तनगर डोंबिवली पूर्व पोलीस ठाण्याच्या पथकास मिळुन आला आहे.प्रकाराबाबत सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादी वरून आरोपीविरूध्द गुन्हा महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142, प्रमाणे, सी.आर.पी.सी 41 (अ),(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, आरोपी सागर दातेरे, यास अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील हे करीत आहेत. Thane Tadipar News
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…