ठाणे : ठाणे शहर पोलीस Thane Police आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाईसाठी राबविलेल्या विशेष मोहिमेत कासारवडवली पोलिसांनी एका तरुणाला अटक करून देशी बनावटीचे पिस्तूल, मॅगझीन व दोन जिवंत काडतुसे असा एकूण ₹६५,६०० किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. Thane Latest Crime News
दिनांक १ सप्टेंबर रोजी रात्री १०:५५ वाजता नागलाबंदर सिग्नल, घोडबंदर रोड येथे सापळा लावून पोलिसांनी आरोपी जोगिंदर लछीराम राजभर (२७, राहणार कासारवडवली, मूळ गाव गाझीपूर, उत्तरप्रदेश) याला पकडले. त्याच्याकडे लाल रंगाच्या बॅगेत लपवलेले पिस्तूल व काडतुसे आढळली. शस्त्र परवाना नसल्याने त्याच्यावर कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रशांत कदम, पोलीस उपआयुक्त परिमंडळ ५
मंदार जवळे, सहा. पोलीस आयुक्त, वर्तकनगर विभाग
यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांच्या पथकाने केली.
कारवाईत सपोनि मनिष पोटे, पो.उ.नि. नितीन हांगे, श्रे.पो.उ.नि. सुनील सुर्यवंशी, तसेच पोलीस अंमलदार जगदीश पवार, जयसिंग राजपूत, गोरक्षनाथ काळे व संदीप तुपे सहभागी होते. पुढील तपास सपोनि मनिष पोटे करीत आहेत.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…