“गुगल अॅप”चं गाजर दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक; शंभरावर लोकांना गंडवणाऱ्या टोळीचा उलगडा
ठाणे | “गुगलसाठी अॅप्स तयार करतो, जाहिरातीतून डॉलरमध्ये परतावा मिळतो,” असं स्वप्न दाखवत एक धूर्त टोळी तब्बल 91 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक करून पसार झाली होती. या गुन्ह्यातील कळीचा सूत्रधार पराग अशोककुमार शहा याला ठाणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथून 4 जून रोजी अटक केली. त्याला न्यायालयाने 11 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
‘क्यु फोन अॅप’च्या नावाखाली गुंतवणुकीचं आमिष
गुजरातस्थित आरोपींसह पराग शहा आणि इतरांनी मे 2020 ते जानेवारी 2024 दरम्यान, ‘क्यु फोन अॅप’ नावाच्या कंपनीच्या माध्यमातून डिजिटल गुंतवणूक योजनेचा बुडबुडा उभा केला. गुगलसाठी अॅप्स तयार करून त्यावर जाहिराती लावल्या जातील आणि त्यातून परकीय चलनात परतावा मिळेल, असा विश्वास निर्माण करण्यात आला.
ठाणे आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी, संशयित पराग शहा पोलिसांच्या जाळ्यात
या आमिषाला बळी पडलेले 124 गुंतवणूकदार आपल्या मेहनतीच्या पैशांची गुंतवणूक करून गंडले गेले. आजवरची फसवणुकीची रक्कम 91 कोटी 63 लाख 71 हजार 047 रुपयांची एवढी असल्याची माहिती समोर आली आहे. या टोळीतील इतर आरोपींमध्ये जयसुख साखरिया, सुधीर कोटाडिया, उमंग कोटाडिया, रंजन कोटाडिया, निरू साखरिया यांच्यासह गुजरातमधील अन्य आठ जणांचा समावेश आहे. तपासात आणखी गुंतवणूकदार बळी पडल्याचे स्पष्ट होत असून फसवणुकीची रक्कम मोठ्या प्रमाणात वाढू शकते, असा पोलिसांचा अंदाज आहे.
आरोपींची यादी
जयसुख हरीभाई साखरिया ऊर्फ पटेल — रा. गुजरात
सुधिरभाई दलसुखभाई कोटाडिया — रा. गुजरात
अवनितराय बाबुभाई बरवालिया ऊर्फ पटेल — रा. गुजरात
उमंग संतिभाई कोटाडिया — रा. गुजरात
रंजन सुधिरभाई कोटाडिया — रा. गुजरात
श्रीमती निरू जयसुख साखरिया — रा. गुजरात
राजेश खोडाभाई पांभर ऊर्फ राजूभाई — रा. गुजरात
प्रविणकुमार मनसुखभाई वोरा — रा. गुजरात
पराग अशोककुमार शहा — रा. नारायणगाव, पुणे
पोलिसांकडून जनतेला सावधगिरीचा इशारा
या प्रकरणी ठाणे आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त पराग मणेरे यांनी जनतेला “जलद परतावा”, “गुगल लिंक” किंवा “डिजिटल इनकम” अशा आमिषांनी फसवणूक होऊ शकते याची जाणीव करून दिली. या प्रकरणी फसवणूक झालेल्या नागरिकांनी पुढे येऊन तक्रारी नोंदवाव्यात, असं आवाहनही त्यांनी केलं.
ही कारवाई पराग मणेरे (पोलीस उप आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखा) दत्तात्रय पाबळे (सहाय्यक पोलीस आयुक्त, आगुशा) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र मंडलिक, पोलीस निरीक्षक अतुल केदार, पोलीस उपनिरीक्षक रोहन शेलार, सहायक पोलीस उपनिरीक्षक कलगुटकर तसेच पोलीस हवालदार ओवळेकर, पिंपळे, राणीम आणि महिला पोलीस शिपाई कवडे (आर्थिक गुन्हे शाखा, ठाणे शहर) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…