Thane Crime News : घरामधून 6.55 लाखांची चोरी ; वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
•सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 6.55 लाखांचा मुद्देमाल लंपास
ठाणे :- शहरात मागील अनेक दिवसांपासून चोरीच्या घटनेमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. ठाण्याच्या देवदया नगर परिसरात राहणारे एका व्यापाऱ्याच्या घरात चोरी झाली आहे. चोरीमध्ये 6.55 लाखाचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केले आहे. या सर्व घटनेबाबत व्यापारी यांनी वर्तक नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
वर्तकनगर पोलीस यांना मिळालेल्या तक्रारीवरून सांगितले की, उन्नती गार्डन,देवदया नगर, ठाणे येथे राहणाऱ्या स्वप्नील महेश राऊत (33 वर्ष) या व्यापाराच्या घरी चोरी झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. दोन महिन्यांकरिता बाहेर गेलेल्या स्वप्नील याच्या घरातील 6 लाख 55 हजार 500 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम यांची चोरी झाली आहे. पोलिसांनी स्वप्निल राऊत यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीच्या विरोधात भादवि कलम 305(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एम आर होळकर हे करत आहे.