Thane Crime News : लोकमान्य नगरमध्ये प्रियकराकडून 50 वर्षीय महिलेची हत्या! – डोक्यात फरशीचा प्रहार करून निर्घृण खून

Thane Latest Murder News : अनैतिक संबंधातून झालेल्या वादातून थरार; महिलेच्या मुलाच्या तक्रारीवरून वर्तकनगर पोलिसांनी आरोपीला केली अटक
ठाणे :- ठाण्यातील लोकमान्य नगर परिसरात अनैतिक संबंधातून झालेल्या वादातून एका 42 वर्षीय प्रियकराने आपल्या 50 वर्षीय प्रेयसीची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी वर्तकनगर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. Thane Latest Crime News
लोकमान्य नगर येथील परेरानगर भागात ही महिला तिच्या 27 वर्षीय मुलासोबत राहत होती. तिचा पती हयात नसून, मागील काही वर्षांपासून तिचे मनोज सैदाने (वय 42) याच्यासोबत अनैतिक संबंध होते. या दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याचे स्थानिक सांगतात.
हत्येची घटना
शुक्रवारी सकाळी त्यांच्यात पुन्हा एकदा जोरदार वाद झाला. या वादातून संतापलेल्या मनोजने महिलेला अमानुष मारहाण केली. एवढेच नाही, तर त्याने महिलेच्या डोक्यात फरशीने प्रहार केला. या गंभीर हल्ल्यात तिचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर मृत महिलेच्या मुलाने दिलेल्या तक्रारीच्या आधारावर वर्तकनगर पोलीस ठाण्यात आरोपी मनोज सैदाने याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला तातडीने अटक केली आहे.
उपायुक्त प्रशांत कदम, सहायक पोलीस आयुक्त मंदार जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण माने आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.


