Thane Crime News : 50 मोबाईल फोन हस्तगत करून मुळ मालकांना परत
खंडणी विरोधी पथकाने नागरिकांचे हरवलेले 21 लाख 50 हजार रूपये किमतीचे एकूण 50 मोबाईल फोन हस्तगत करून मुळ मालकांना परत
ठाणे :- पोलीस आयुक्तालयाचे हद्दीतील नागरीकांचे मोबाईल फोन हरवण्याचे प्रमाण वाढल्याने त्याबाबत पोलीस आयुक्त , ठाणे शहर व इतर वरिष्ठांनी हरविलेली मालमत्ता (मोबाईल फोन) शोधुन ती संबंधीत नागरीकांना परत करण्याबाबत आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने खंडणी विरोधी पथकाकडून https://ceir.gov.in या वेबसाईटच्या आधारे नागरीकांचे हरविलेल्या मोबाईल फोनची माहिती मिळवुन त्याबाबत तांत्रिक तपास करून एकूण 21 लाख 50 हजार रूपये किमतीचे एकूण 50 मोबाईल फोन शोधुन काढून, हस्तगत करण्यात आले असून ते संबंधित नागरीकांना खात्रीकरून परत करण्यात आले आहेत.
पोलीस पथक
पोलीस आयुक्त, ठाणे शहर आशुतोष डुंबरे, पोलीस सह आयुक्त,ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, शिवराज पाटील,सहायक पोलीस आयुक्त, शोध 2, गुन्हे शाखा, इंद्रजित कार्ले, सहायक पोलीस आयुक्त, विशेष कार्य दल, गुन्हे शाखा, शेखर बागडे यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकातील महिला पोलीस निरीक्षक वनिता पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण गोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भुषण कापडणीस, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल तारमळे, पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक सुभाष तावडे, कल्याण ढोकणे, संजय बाबर, पोलीस हवालदार सचिन शिंपी,योगीराज कानडे, संदिप भोसले, संजय राठोड, गणेश गुरसाळी, महिला पोलीस हवालदार शितल पावसकर, महिला पोलीस शिपाई मयुरी भोसले,तानाजी पाटील, अरविंद शेजवळ, पोलीस नाईक भगवान हिवरे यांनी केली आहे.
नागरिकांना आवाहन
ठाणे पोलीस आयुक्तालयअंतर्गत ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबीवली, उल्हासनगर, बदलापूर परिसरातील रहिवाश्यांना याद्वारे आवाहन करण्यात येते की, अशाप्रकारे चोरीस गेलेले व गहाळ झालेले मोबाईल फोन बाबतची माहिती जवळच्या पोलीस ठाणे देवुन https://ceir.gov.in या वेबसाईटवर अपलोड करावी,