Thane Crime News : टेलिग्राम प्रिपेड टास्कच्या द्वारे 24.40 लाखांचा ऑनलाइन गंडा
•Thane Crime News ऑनलाइन आर्थिक फसवणूक, टेलिग्राम, ऑनलाइन टास्क, लाखोंची फसवणूक
ठाणे :- लोढा अमारा, ठाणे पश्चिम या उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या एका महिलेला टेलिग्राम च्या माध्यमातून लाखो रुपयाची धोकाधडी झाल्याची घटना कापूरबावडी पोलीस ठाण्यात नोंदवल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. ऑनलाइन टास्क पूर्ण केल्यास नफा मिळेल तसेच या नफ्याच्या आमिषाला महिला बळी पडली आहे. महिलेने 24 लाख 40 हजार 800 रुपयाची ऑनलाइन अज्ञात आरोपींच्या वेगवेगळ्या बँकेच्या खात्यात जमा केले आहे. गुंतवलेले पैसे परत न मिळाल्याने आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येतात कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 41 वर्षीय महिलेला ऑनलाइन टेलिग्रामवर मेसेज करून त्यांना एक लिंक पाठवण्यात आली. त्या लिंक द्वारे महिलेला युजर आयडी आणि पासवर्ड तयार करण्यास सांगितले. तसेच, इतर दोन आरोपींनी टेलिग्रामवरील 5000-VIP या टेलिग्राम ग्रुप मध्ये ऍड करून त्याद्वारे ऑनलाईन प्रिपेड टास्क करिता 24 लाख 40 हजार 80 रुपये विविध बँक खात्यावर जमा करण्यास सांगितले. त्या बदल्यात मोठ्या प्रमाणे नफा मिळेल असे आमिष दाखविले. परंतु कालांतराने कोणत्याही प्रकारे ऑनलाईन गुंतवणूक केलेली रक्कम परत न मिळाल्याने आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने कापूरबावडी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान अधिनियमन सन 2000 चे कलम 66 (ड), 66 (क) भारतीय न्याय संहिता 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महाडिक हे करत आहे.