ठाणे

Thane Crime News : 21 वर्षीय तडीपार आरोपीला अटक,मनाई आदेश भंग प्रकरणी अटक

•Thane Crime News वागळे इस्टेट पोलिसांची कारवाई ; तडीपार आरोपीला ठाण्याच्या बियर कंपनी परिसरातून अटक..

ठाणे :- मनाई आदेश भंग करणाऱ्या 21 वर्षीय तडीपार आरोपीला ठाण्याच्या वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीवर ठाण्याच्या विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्ह्यांची नोंद असल्याने पोलिसांनी शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता त्याला ठाणे जिल्ह्यातून एक वर्षाच्या कालावधी करिता हद्दपार केले होती.

ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि पोलीस उप आयुक्त परिमंडळ-05 यांची कोणतीही परवानगी न घेता शहरामध्ये प्रवेश केला होता. आरोपी किशोर राजा साथलिया (21 वर्ष) याला 17 ऑगस्ट 2023 रोजी ठाणे जिल्ह्यातून एक वर्षाच्या कालावधी करिता पोलीस उप आयुक्त परिमंडळ-05 वागळे इस्टेट यांनी हद्दपार केले होते. मनाई आदेश भंग करून 24 जून रोजी सायंकाळी 6.20 वाजताच्या सुमारास आरोपी ठाण्याच्या बिअर कंपनी जवळ आले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. वागळे इस्टेट पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-5 पोलिसांनी सापळा रचून आरोपीला बियर कंपनी येथून अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी किशोर याच्या विरोधात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी किशोर याच्या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार महाले हे करत आहेत.

vivek

Share
Published by
vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

7 hours ago