Thane Police Latest News : ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाढत्या मोबाईल स्नॅचिंगच्या घटनांना आळा घालण्यासाठी मालमत्ता गुन्हे कक्षाने धडाकेबाज मोहीम राबवून ७ गुन्हे उघडकीस आणले, तब्बल ₹२.७६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आणि ५ सराईत आरोपींना जेरबंद केले.
🚔 कारवाईची ठळक वैशिष्ट्ये
➡️ उघडकीस आलेले गुन्हे: ०७ (नारपोली, श्रीनगर, राबोडी, कळवा, ठाणे रेल्वे पो.स्टेशन हद्दीतील)
➡️ जप्त मुद्देमाल:
अॅपलसह विविध कंपन्यांचे ०६ हाय-एंड मोबाईल – ₹२,२६,०००/-
सुझुकी बर्गमॅन मोटरसायकल – ₹५०,०००/-
➡️ एकूण जप्त रक्कम: सुमारे ₹२,७६,०००/-
➡️ अटक आरोपी:
1️⃣ मोहंमद यासीन रफीक शेख (२४)
2️⃣ माझ मोहंमद अयुब मोमीन (२१)
3️⃣ अल्केश परवेज मोमीन (२३)
4️⃣ मोहंमद उबेद उर्फ लाला मोहंमद आरीफ शेख (२१)
5️⃣ सदरूददीन जमालुददीन अन्सारी (४७)
धोरणी तपास आणि विजयी सापळा
पोना सचिन कोळी व पोना तौसिफ सैयद यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तांत्रिक विश्लेषण करून भिवंडी परिसरात जाळं पसरवण्यात आलं. सापळा रचताच संपूर्ण टोळीला पकडण्यात पोलिसांना यश आले. चौकशीत आरोपींनी ठाणे परिसरातील विविध ठिकाणी मोबाईल स्नॅचिंग केल्याची कबुली दिली. Thane Police Latest News
मार्गदर्शनाखालील विजयी पथक
ही कारवाई पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे शोध-२) विनय घोरपडे यांच्या पथदर्शक मार्गदर्शनाखाली पार पडली.
कारवाईत वपोनिरी गोरखनाथ घार्गे, सपोनि अब्दुल मलीक, पोउनि संजय भिसे, सपोउनि शिवाजी गायकवाड यांच्यासह मालमत्ता गुन्हे कक्षातील धडाडीच्या पथकाने सहभाग घेतला.
संदेश नागरिकांना
मोबाईल स्नॅचिंग सारख्या गुन्ह्यांवर पोलिसांचा मजबूत पकड आणि अत्याधुनिक तांत्रिक तपास हे ठाणेकरांसाठी सुरक्षिततेची हमी ठरत आहेत.
नागरिकांनीही संशयास्पद हालचाली किंवा चोरीसंबंधी माहिती त्वरित पोलिसांना कळवावी.
ठाणे पोलिसांचा इशारा:
“गुन्हेगार कुठेही लपला तरी पोलिसांच्या रडारपासून सुटणार नाही!”
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…