Thane Police News : वागळे इस्टेटमधील मॉलबाहेर सुरू होता शस्त्रांच्या विक्रीचा डाव; खंडणी विरोधी पथकाची मोठी कारवाई
ठाणे l ठाणे शहरात Thane Police बेकायदेशीर शस्त्रांची विक्री करण्याच्या उद्देशाने आलेल्या एका तरुणाला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने रंगेहाथ पकडले आहे. वागळे इस्टेट परिसरातील इंटरसिटी मॉलच्या बाजूला असलेल्या साई पान शॉपसमोर पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईत दोन गावठी बनावटीचे पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे असा एकूण 2 लाख 14 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला असून, या प्रकरणी एका विधीसंघर्षित बालकाविरुद्ध (उत्तर प्रदेशातील रहिवासी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Thane Gun Smuggling News
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, 18 जानेवारी 2026 रोजी पहाटेच्या सुमारास एक तरुण वागळे इस्टेट पश्चिम येथे शस्त्र विक्रीसाठी येणार असल्याची खबर खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी फुटपाथवर सापळा रचला. संशयित तरुण तिथे येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली. यावेळी त्याच्याकडे विनापरवाना बाळगलेली दोन घातक पिस्तूल आणि काडतुसे मिळून आली. सदर तरुण हा उत्तर प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 3, 25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1), 135 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या कारवाईत अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त अगरसिंह जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विनय घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सुनील तारमळे आणि त्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. ठाण्यात हे शस्त्र कोणाला विकले जाणार होते आणि याचे मूळ धागेदोरे कोठे आहेत, याचा अधिक तपास आता पोलीस करत आहेत.
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…